लग्नाआधीच नवरदेवाने केली ही मागणी, नवरीने विनंती केली तरी ऐकलं नाही, धक्कादायक घटना
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
मोनिका (नाव बदललेले) हिचे लग्न महाराष्ट्रातील नागपूर येथील विवेक (नाव बदललेले) याच्यासोबत ठरले होते. 10 मे रोजी दोघांचे लग्न होणार होते.
बालाघाट : सध्या लग्नसराई सुरू आहे. विविध ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात लग्नसोहळे पार पडत आहेत. यातच आता एका लग्नसोहळ्यात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
वराने हुंड्याची मागणी करत लग्नास नकार दिला, असा आरोप करण्यात आला आहे. वधूपक्षाच्या मंडळींकडून वरपक्षाच्या मंडळीला विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी हुंड्याच्या कारणाने लग्नास नकार दिला. यानंतर वधूच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. मध्यप्रदेशातील बालाघाट येथील किरनापूर पोलीस ठाणे हद्दीतील रमगढी येथील ही घटना आहे.
नेमकं काय घडलं -
रमगढी गावातील रहिवासी मोनिका (नाव बदललेले) हिचे लग्न महाराष्ट्रातील नागपूर येथील विवेक (नाव बदललेले) याच्यासोबत ठरले होते. 10 मे रोजी दोघांचे लग्न होणार होते. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारी व्यस्त होते. विवाहाचा दिवस जवळ आला तर ऐनवेळी वराने आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला.
advertisement
पायऱ्यांखाली चुकूनही ठेऊ नका या वस्तू, घरात येईल नकारात्मकता, काय कराल?
मोनिकाने सांगितले की, 9 मे रोजी विवेकने तिला फोन केला होता आणि हुंड्यात दुचाकी, एक सोन्याची चैन आणि दोन लाख रुपये कॅश अशी मागणी केली होती. यासोबतच त्याने वरात आणण्याचा खर्च आणि डीजेचा खर्चही देण्याची मागणी केली होती. या सर्व मागण्या मान्य झाल्यावर वरात आणणार, असे त्याने म्हटले होते.
advertisement
त्यावर तिने विवेकला सांगितले की, माझे वडील तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करतील. फक्त उद्या तुम्ही वरात घेऊन या. यानंतर ते सर्वजण 10 मे रोजी वरातीची वाट पाहत राहिले. मात्र, विवेक आणि त्याचे कुटुंबीय वरात घेऊन आले नाही.
पतीचं निधन, पत्नीनं उचलली घराची जबाबदारी अन् मुलाला बनवलं IPS, जिद्दीची अनोखी कहाणी
वधूच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. तसेच त्यांच्या मागण्या मान्यही करायला तयार झालो होतो. त्यांनी वरात आल्यावर सर्व मागण्या पूर्ण करण्यास सांगितल्या होत्या. मात्र, त्यांना हुंड्यातल्या वस्तू आधी पाहिजे तर आम्ही वरात आणू, असे ते म्हणाले होते. मग नंतर संवाद वरात आणण्यास ते तयार झाले. मात्र, 10 मे रोजी ते वरात घेऊन आले नाही.
advertisement
आम्ही त्यांना खूप विनंती केली. मात्र, त्यांनी ऐकले नाही. यामुळे आईलाजास्तव आम्हाला पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. आम्ही तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
Location :
Madhya Pradesh
First Published :
May 14, 2024 8:12 AM IST
मराठी बातम्या/Viral/
लग्नाआधीच नवरदेवाने केली ही मागणी, नवरीने विनंती केली तरी ऐकलं नाही, धक्कादायक घटना