पतीचं निधन, पत्नीनं उचलली घराची जबाबदारी अन् मुलाला बनवलं IPS, जिद्दीची अनोखी कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Mother's Day Special : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, इतकं आईचं महत्त्व आहे. आज सर्वत्र मदर्स डे साजरा केला जात आहे. यातच आम्ही तुम्हाला आई आणि मुलाच्या संघर्षाची एक अनोखी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत. या महिलेने आपल्या पतीच्या निधनानंतर परिस्थितीचा सामना करत मुलाला IPS पदापर्यंत पोहोचवले. (ऋतु राज/मुजफ्फरपुर)
advertisement
रीना देवी अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. त्यांनी सांगितले की, 2009 मध्ये विशाल छपरा येथील रामकिशोर उच्च विद्यालयात आठवीच्या वर्गात असताना त्यांचे वडील बिकाऊ प्रसाद यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर तीन मुलांची जबाबदारी आली. तसेच त्यांच्या आयुष्याचा मार्ग खडतर झाला होता. मात्र, तरीही त्यांनी मुलांमध्ये असलेली अभ्यासाची ओढ पाहून त्यांना पुढे घेऊन जाण्याचा निर्णय केला.
advertisement
रीना देवी या लोकल18 शी बोलताना पुढे म्हणाल्या की, विशालचे प्राथमिक शिक्षण हे गावातीलच सरकारी शाळेतून झाले. यानंतर आर के हायस्कूल येथून दहावीचे शिक्षण घेते. त्यावेळी तो जिल्ह्यात टॉपर होता. यानंतर लंगट सिंह कॉलेज येथील बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याची सुपर 30 मध्ये निवड झाली. आयआयटी कानपूर येथून बीटेक केल्यावर रिलायन्स मध्ये त्याने नोकरीला सुरुवात केली. मात्र, नोकरीवर तो समाधानी नव्हता. माझी नोकरी करताना मला आनंद मिळत नाही. तसेच मला यापेक्षा आणखी काहीतरी चांगले आपल्या देशासाठी करायचे आहे, अशी त्याची इच्छा होती.
advertisement
advertisement