नोएडातील हे प्रकरण आहे. ईडीने एका घरावर छापा टाकला. तेव्हा जे दृश्य पाहिलं ते पाहून सगळे हादरले. या कपलच्या घरी काही तरुणी होत्या. या तरुणी मॉडल्स होत्या. ज्या शो करत होत्या. हा शो साधासुधा नाही. तर आक्षेपार्ह होता. तसंच घरातून 8 लाख रुपयेही जप्त करण्यात आले.
कपलने बनवली होती कंपनी
advertisement
नवरा-बायकोने मिळून सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवली होती. कंपनी जाहीरात मार्केटिंग रिसर्च आणि ओपनियन पोलशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं होतं. FEMA नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय होता म्हणून ईडीने धाड चाकली. तेव्हा सत्य समोर आलं.
Work From Home च्या नावाने महिलांची हनीट्रॅपसाठी भरती, गोव्यात फ्रॉड, मुंबईशी कनेक्शन
मॉडलिंगमध्ये करिअर बनवण्याच स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना हे कपल सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढायचे. जाहीरात पाहून तरुणी त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या. त्यांना पैशांचं आमिष देऊन अश्लील व्हिडीओच्या धंद्यात ढकललं जायचं. त्यांनी 500 तरुणी हायर केल्या अशी माहिती आहे.
आक्षेपार्ह व्हिडीओचा व्यवसाय
ही कंपनी आक्षेपार्ह व्हिडीओचा व्यवसाय करत होती. कपल एका परदेशी वेबसाईटला आक्षेपार्ह व्हिडीओ आणि वेबकॅम शो विकत होते. कोट्यवधींची कमाई करत होते. कपलने साइप्रसची कंपनी टेक्नियस लिमिटेडसोबत करार केला होता. ही कंपनी एक्हॅम्सटर, स्ट्रिपचॅट अशा अश्लील वेबसाईट चालवते. अश्लील व्हिडीओ बनवून हे कपल या कंपन्यांना विकायचं. त्याबदल्यात त्यांना मोठी रक्कम पाठवली जायची. कमाईचा 25 टक्के हिस्सा हे कपल मॉडल्सना द्यायचं.
बायको जवळ घ्यायची नाही, सासूवर होता डोळा, 37 वर्षीय नवऱ्यासोबत भयंकर कांड
ईडीच्या मते, सबडिजी कंपनी आणि संचालकांच्या अकाऊंटमध्ये परदेशातून 15.66 कोटी आल्याचं समजलं. याशिवाय नेदरलँड्समधूनही एका अकाऊंटमधून 7 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. हे पैसे इंटरनॅशनल डेबिट कार्डच्या माध्यमातून कॅशच्या रुपात काढण्यात आले आहेत. आतापर्यंत 22 कोटी रुपयांबाबत माहिती मिळाली आहे.