TRENDING:

लग्न झालं, दोन मुलं झाली आणि समोर आलं नवऱ्याचं ते गुपित; सत्य कळताच सुन्न झाली बायको

Last Updated:

एका बायकोसमोर लग्नाच्या अनेक वर्षांनंतर असं सत्य समोर आलं की तिचं संपूरण जगच बदलून गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या काही दिवसांत देशभरात नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कुठे सासू आपल्या जावयासोबत पळून जातेय, तर कुठे वहिनी आणि दीर लग्नबंधनात अडकतायत. अशाच प्रकारचं एक प्रकरण अयोध्येत घडलं असून, त्याने सगळीकडे खळबळ माजली आहे.
Ai Generated Photo
Ai Generated Photo
advertisement

रामनगर रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या आरती चौहान हिने आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली आहे. आरतीचं लग्न 2020 साली सनी नावाच्या युवकासोबत झालं. लग्न हिंदू पद्धतीने अयोध्येतील देवकाली मंदिरात पार पडलं होतं. लग्नानंतर आरती आणि सनीला दोन मुलं झाली. घर आनंदात चाललं होतं, पण अचानकच नवऱ्याचं असं सत्य बाहेर की आरतीच्या पायाखालची जमीन सरकली.

advertisement

आरतीला समजलं की तिचा नवरा सनी प्रत्यक्षात खुर्शीद आलम नावाचा मुस्लिम युवक आहे. त्याने हिंदू क्षत्रिय असल्याचं भासवून तिचा विश्वास संपादन केला होता. एवढंच नाही, तर नंतर त्याने आरतीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. घरात गणपती बसवायचे ठरवल्यावर तर तिला मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या.

आरतीच्या म्हणण्यानुसार, खुर्शीद तिला औषधं देऊन बेशुद्ध करत असे आणि नंतर तिच्याशी अश्लील वर्तन करत असे. इतकंच नाही तर त्याच्या मित्रांनाही जबरदस्तीने यात सामील केलं जात होतं. या कटात शेजारी सफीक, त्याची पहिली पत्नी सिमरन आणि आणखी 15 लोक सामील असल्याचा दावा आरतीने केला आहे.

advertisement

सध्या आरती आणि तिची दोन मुलं भीतीचं जीवन जगत आहेत. तिने पोलिसांकडे वारंवार तक्रार केली असली तरी अद्याप कारवाई झालेली नाही. अखेर निराश झालेल्या आरतीने इशारा दिला आहे की “जर मला वेळेत न्याय मिळाला नाही, तर मी माझ्या दोन मुलांसह मुख्यमंत्री यांच्या दरबारात स्वत:ला संपवेन.”

मराठी बातम्या/Viral/
लग्न झालं, दोन मुलं झाली आणि समोर आलं नवऱ्याचं ते गुपित; सत्य कळताच सुन्न झाली बायको
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल