तुमचे मूल रिमोटने खेळत असेल तर सावध राहा, कारण इंग्लंडमधील लिव्हरपूलच्या वेस्ट डर्बी या उपनगरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तेथे चार वर्षांच्या निष्पाप मुलाने रिमोटची बॅटरी गिळली. त्या मुलाची आणि त्याच्या आई-वडिलांची अवस्था जाणून घेतल्यानंतर, तुम्ही तुमच्या मुलांना पुन्हा रिमोटला हातही लावूच देणार नाही
Viral Video : रस्त्याच्या मधून जात होता कोब्रा, बाजूने बाईक जाताच अटॅक करण्यासाठी धावला आणि...
advertisement
'मिरर' वेबसाइटच्या वृत्तानुसार, कॅडेन टेलर नावाच्या 4 वर्षांच्या मुलाने चुकून रिमोट कंट्रोलची बॅटरी गिळली. ही बॅटरी त्याच्या पचनसंस्थेचा भाग असलेल्या अन्ननलिकेत अडकली. अन्ननलिका ही आपल्या तोंडाला पोटाशी जोडणारी पाइप आहे, ज्याद्वारे अन्न आपल्या पोटात पोहोचते. कॅडनच्या या छोट्याशा चुकीने त्याला मृत्यूच्या उंबरठ्यावर आणले. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर या मुलाचे प्राण वाचले आहे.
कॅडेन टेलरसोबतची ही घटना त्याच्या आजीच्या घरी घडली. त्याने बॅटरी गिळल्याचे त्याच्या कुटुंबीयांना समजताच ते घाबरे आणि त्यांनी घाईघाईत त्यांनी त्याला स्थानिक रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी कॅडेन टेलरचा एक्स-रे केला. त्यामुळे कॅडेन एसोफॅगसमध्ये बॅटरी धोकादायकरित्या अडकल्याचे डॉक्टरांना समजले. लवकर काही केले नाही तर कॅडेनचा जीव जाऊ शकतो हे समजायला त्यांना वेळ लागत नाही.
कॅडनच्या अन्ननलिकेमध्ये एका महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि हृदयाजवळ बॅटरी अडकली होती. तेथे रक्तस्त्राव होण्याचा धोका डॉक्टरांना वाटत होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी तात्काळ कॅडेनला लिव्हरपूल येथील 'अल्डर हे चिल्ड्रन' रुग्णालयात पाठवले. कॅडनला तेथे विमानाने नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या अन्ननलिकेतून बॅटरी काढली. ज्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. पण त्याला काही दिवस ICU वरच रहावे लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
