प्रश्न - पृथ्वी सर्वांत जास्त गरम कधी आणि कुठे झाली होती?
उत्तर - पृथ्वीवर आतापर्यंतचं सर्वांत जास्त तापमान 134 F (56.67 सेल्सिअस) होते. एवढ्या जास्त तापमानाची नोंद डेथ व्हॅली, नेवाडा या ठिकाणी जुलै 1913 मध्ये करण्यात आली होती.
प्रश्न - कोणत्या प्राण्याला फुफ्फुसं नसतात?
उत्तर- मुंग्यांना फुफ्फुसं नसतात. ते त्यांच्या शरीरावर असलेल्या लहान छिद्रांमधून श्वास घेतात ज्याला स्पायरॅकल्स म्हणतात.
advertisement
प्रश्न - कोणत्या सजीवाचे हृदयाचे ठोके तीन किलोमीटर अंतरावर ऐकू येतात?
उत्तर - ब्लू व्हेल हा एकमेव असा सजीव आहे, ज्याच्या हृदयाचे ठोके 3 किलोमीटर अंतरावरूनही ऐकू येतात असा दावा केला जातो.
प्रश्न - पाण्यानंतर जगात सर्वांत जास्त प्यायलं जाणारं पेय कोणतं आहे?
उत्तर - चहा हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय आहे, असं मानलं जातं.
प्रश्न - टॉयलेट पेपरआधी कोणत्या गोष्टीचा वापर होत होता?
उत्तर - टॉयलेट पेपरच्या आधी मक्याच्या कणसाच्या सालींचा वापर केला जात असे.
प्रश्न - आतापर्यंतची समुद्राची सर्वांत मोठी लाट कधी आणि कुठे आली होती?
उत्तर - आतापर्यंतची समुद्राची सर्वांत मोठी लाट अलास्का इथल्या लिटुआ खाडीमध्ये आली होती. 1958मध्ये आलेल्या या लाटेची उंची 1,720 फूट होती.
प्रश्न - पृथ्वीशिवाय इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे?
उत्तर - पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही.
प्रश्न - पृथ्वीवर एका सेकंदात किती वेळा वीज कोसळते?
उत्तर - पृथ्वीवर एका सेकंदात सरासरी शंभर वेळा वीज कोसळते.
