इस्रायलने इराणवर हल्ला करण्याच्या वेळी अमेरिकन संरक्षण विभागाजवळील तीन रेस्टॉरंट्समध्ये अचानक पिझ्झाच्या ऑर्डर वाढल्या. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, पेंटागॉनजवळील सर्व पिझ्झा आउटलेट अचानक गर्दीने भरले होते. दुसऱ्या पोस्टनुसार, बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या डिस्ट्रिक्ट पिझ्झा पॅलेसमध्येही अचानक मोठी गर्दी दिसली. व्हाईट हाऊसजवळील डोमिनोजमध्येही नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली.
advertisement
पिझ्झा इंडेक्सच्या समर्थकांचा असा दावा आहे की याची ऐतिहासिक उदाहरणं आहेत. 1990 मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण करण्याच्या आदल्या रात्री वॉशिंग्टन, डीसीमध्ये पिझ्झाच्या ऑर्डरमध्ये वाढ झाली होती. 1991 मध्ये ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मच्या आधी डोमिनोजचे मालक फ्रँक मीक्स यांनीही असाच ट्रेंड नोंदवला होता.
इस्रायली हल्ल्यापूर्वीही पिझ्झाच्या ऑर्डरमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं.अमेरिकेला कदाचित याबद्दल आधीच माहिती होती. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इस्रायलने अमेरिकेला हल्ल्याची आगाऊ माहिती दिली होती.
आधी स्फोटांचे आवाज नंतर जफर एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले, पाहा VIDEO
एका अनामिक एक्स अकाउंटद्वारे एक सिद्धांत पसरवला गेला आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, जेव्हा पेंटागॉनला पिझ्झाच्या ऑर्डर अचानक वाढतात तेव्हा एक मोठी लष्करी कारवाई होणार असे संकेत मिळतात. जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा पेंटागॉनचे अधिकारी त्यांचे डेस्क सोडत नाहीत. वॉर रूम सक्रिय होतात, कॉल सतत चालू राहतात आणि फास्ट फूड, विशेषतः पिझ्झा, सर्वात जलद आणि सर्वात सोयीस्कर पर्याय बनतो.