आधी स्फोटांचे आवाज नंतर जफर एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले, पाहा VIDEO

Last Updated:

जाकोबाबादमध्ये जाफर एक्सप्रेसला रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने लक्ष्य केले, ज्यामुळे 6 डबे रुळावरून घसरले. जीवितहानी नाही, तपास सुरू आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या रेल्वे व्यवस्थेवर टीका.

News18
News18
आधी स्फोटांचे आवज आले, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आणि त्यानंतर पुढच्या क्षणी एक दोन नाही तर 6 डबे रुळावरुन घसरले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यातून उड्या मारल्या. जाकोबाबादमधील गुरांच्या बाजाराजवळील रेल्वे ट्रॅकजवळ भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे जाफर एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले.
स्फोटाची आणि रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, क्वेट्टाहून पेशावरला जाणारी ट्रेन रुळावरून घसरली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचे कारण आणि स्वरूप शोधण्यासाठी तपास सुरू आहे. जीवितहानी झाली नसल्याने चिंता करण्याचे कारण नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध सुरू आहे.
advertisement
जाकोबाबादमध्ये क्वेट्टा-पंजाबला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसला रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने लक्ष्य केल्याचा दावा बलुच रिपब्लिकन गार्ड्सने केला आहे, ज्यामुळे ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. अपघातानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
प्रवासी रेल्वेतून खाली उतरले असून गोंधळ दिसत आहे. आधीच अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना हा भीषण अपघात झाला असून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे रेल्वेही रुळावरुन घसल्याची टीका सोशल मीडियावर सुरू आहे.
मराठी बातम्या/विदेश/
आधी स्फोटांचे आवाज नंतर जफर एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement