इस्रो प्रमुखांनी दिला मोठा इशारा
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, "आपलं आयुर्मान 70 ते 80 वर्षे आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात अशा आपत्ती दिसत नाहीत, म्हणून आपण असं मानतो की अशा बाबी शक्य नाहीत. जगाचा आणि विश्वाचा इतिहास पाहिला तर, ग्रहांच्या जवळ येणारे लघुग्रह आणि त्यांच्या प्रभावाच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत. मी गुरू ग्रहाला आदळणारे लघुग्रह पाहिले आहेत, मी शूमेकर-लेव्हीला आदळताना पाहिलं आहे. पृथ्वीवर अशी एखादी घटना घडली तर आपण सर्व नामशेष होऊ."
advertisement
ते पुढे म्हणाले, "या शक्यता सत्यात उतरू शकतात. त्यासाठी आपण स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. मातेसमान असणाऱ्या पृथ्वीबाबतीत असं घडू नये, अशी आमची इच्छा आहे. येथे माणूस आणि सर्व सजीवांनी वास्तव्य करावं, अशी आमची इच्छा आहे. पण, आपण आपत्तींना थांबवू शकत नाही. आपल्याला पर्याय शोधावा लागेल. यासाठी आमच्याकडे एक मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही लघुग्रहांना विचलित करू शकतो. आम्ही पृथ्वीच्या जवळ येणारे लघुग्रह शोधून त्यांना विचलित करू शकतो. पण, कधीकधी हे सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. अंदाज लावण्याची क्षमता, त्यांना विचलित करण्यासाठी जड प्रॉप्स पाठवण्याची क्षमता, निरीक्षणात सुधारणा आणि प्रोटोकॉलसाठी इतर देशांसोबत एकत्र काम करणं गरजेचं आहे."
आपल्या सूर्यमालेतील बहुतेक लघुग्रह हे गुरू आणि मंगळाच्या कक्षेतील मुख्य लघुग्रहांच्या पट्ट्यात स्थित आहेत आणि ते कधीही पृथ्वीच्या जवळ येत नाहीत. पण, अंतराळात भरकटलेले काही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही.