रिळामधील धागा संपला की तुम्ही त्याचं काय करता, तर फेकून देता. पण याचा बर्याच पद्धतीने वापर करता येऊ शकतो. त्यापैकीच एक म्हणजे उंदरांना पळवण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता, आता ते कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नेमकं काय करायचं ते पाहुया.
बाथरूममध्ये लावा एक फुगा, होईल कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल
advertisement
व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे. त्यात हळद, गव्हाचं पीठ, तूप किंवा तेल तुरटीची पूड आणि धागे कापून टाका. एकत्र करून मिक्स करून घ्या. थोडं पाणी टाकून हे मिश्रण मळून घ्या.
आता धाग्याचे रिकामी रिळ घ्या. त्याचे छोटे तुकडे करा. त्याभोवती तयार केलेलं मिश्रण लावा. जिथं उंदीर येतात तिथं हे मिश्रण लावलेले रिळ ठेवा. त्यामुळे उंदीर घरातून पळून जातील असा दावा या महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे.
हा व्हिडिओ यूट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ मध्ये करण्यात आलेल्या दाव्याची न्यूज18मराठी पुष्टी करत नाही.