Jugaad Video : बाथरूममध्ये लावा एक फुगा, होईल कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल

Last Updated:

बाथरूममध्ये फुगा ठेवल्याने पैशांची बचत होईल, असा दावा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

फोटो : व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली : फुगा म्हणजे लहान मुलांचं खेळणं. पण हाच फुगा घरातही तुमच्या किती कामाचा आहे माहिती आहे का? विशेषत: बाथरूममध्ये तुम्हाला फुग्याचा वापर करता येऊ शकतो. बाथरूममध्ये फुग्याच्या वापर कसा करायचा, या जबरदस्त असा किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
फुगा आणि बाथरूममध्ये कसा वापरायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा व्हिडीओ पाहा. एकदा हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हीसुद्धा हा उपाय कराल. या उपायाने पैशांची बचत होईल असा दावा या महिलेने केला आहे. आता ते कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. चला तर व्हिडीओ पाहुयात.
advertisement
व्हिडीओत महिलेनं दाखवल्यानुसार एक फुगा घ्यायचा आहे. त्याचं एक टोक तर खुलंच असतं, दुसरं टोकही कापायचं आहे. आता फुग्याचा कापलेला भाग बाथरूमच्या जाळीवर लावा. फुग्याचा आधीपासून खुला असलेला भाग खाली लटकता राहिल. आता ही जाळी बाथरूममध्ये लावा.
advertisement
याचा फायदा काय तर बाथरूमच्या जाळी केस किंवा आणखी काही कचरा अडकतो. ज्यामुळे पाणी जात नाही किंवा काही वेळा हा कचरा पाईपमध्ये जाऊन अडकतो आणि पाईप ब्लॉक होतो. पण फुगा लावल्याने हा कचरा जाळीवरच अडकेल आणि फुग्याच्या दुसऱ्या बाजूतून पाणी खाली जाईल.
advertisement
सूचना - हा व्हिडीओ सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : बाथरूममध्ये लावा एक फुगा, होईल कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement