Kitchen Jugaad Video : इंडियन असो वा वेस्टर्न, टॉयलेटमध्ये एका चाकूची कमाल

Last Updated:

चाकू तुम्ही कधी टॉयलेटमध्ये वापरून पाहिला आहे का? टॉयलेटमध्ये चाकू वापरण्याचा मोठा फायदा. टॉयलेटमध्ये चाकू वापण्याचा असा परिणाम की तुम्ही विचारही केला नसेल.

किचन जुगाड (फोटो : युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो : युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली : चाकू, सुरी याचा वापर आपण सामान्यपणे किचनमध्ये करतो. भाजी, कांदा, टोमॅटो असे पदार्थ कापण्यासाठी, चिरण्यासाठी चाकू-सुरीचा वापर करतो. पण हाच चाकू तुम्ही कधी टॉयलेटमध्ये वापरून पाहिला आहे का? टॉयलेटमध्ये चाकू वापरण्याचा मोठा फायदा. टॉयलेटमध्ये चाकू वापण्याचा असा परिणाम की तुम्ही विचारही केला नसेल.
चाकूचा टॉयलेटमध्ये वापराचा जबरदस्त असा किचन जुगाड व्हिडीओ. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आता चाकूचा टॉयलेटमध्ये काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नेमकं काय करायचं आहे ते आपण पाहुयात.
advertisement
टॉयलेटमध्ये कसा वापरायचा चाकू?
टॉयलेटच्या काही भागावर विशेषतः वेस्टर्न टॉयलेटच्या मागच्या बाजूला खाली जो पाईप असतो त्यावर तुम्हाला सिमेंटसारखं काहीतरी दिसेल. इथं तुम्ही हार्पिक टाका आणि ब्रशने घासा तरी ते निघणार नाही. महिलेनं व्हिडीओ ते दाखवलं आहे. पण हाच भाग तुम्ही चाकू किंवा सुरीनं घासला तर ते सहज निघतं. टॉयलेट पांढरंशुभ्र दिसतं.
advertisement
अशाच पद्धतीनं कमोडचा खालचा भाग तोसुद्धा टॉयलेट क्लिनर टाकून स्वच्छ होत नाही, बिलकुल जात नाही. इथंसुद्धा तुम्ही चाकूने घासून पाहा आणि मग कमाल बघा. महिलेनं व्हिडीओत सांगितल्यानुसार तिनं हे करताना टॉयलेट क्लिनर टाकलेलं नाही. टॉयलेट क्लिनर न टाकता फक्त चाकूनं घासून तिनं टॉयलेट स्वच्छ केलं आहे. अशाच पद्धतीने टॉयलेटमधील कोपरेही स्वच्छ करता येतील असं या महिलेनं सांगितलं आहे. तुम्ही इंडियन टॉयलेटमधील कोपरे अशापद्धतीने स्वच्छ करू शकता.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी जो चाकू तुम्ही वापरणार आहात तो वेगळा ठेवा, त्याचा वापर किचनमध्ये करू नका असा सल्ला महिलेनं दिला आहे. Unik Vlogger युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
advertisement
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : इंडियन असो वा वेस्टर्न, टॉयलेटमध्ये एका चाकूची कमाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement