Kitchen Jugaad Video : आईस्क्रिम खाल्ल्यानंतर काठी फेकू नका; टॉयलेटमध्ये मोठा फायदा
- Published by:Priya Lad
Last Updated:
आईस्क्रिमची एक छोटीशी काठी तुमचं टॉयलेटमधील मोठं काम करून देईल.
नवी दिल्ली : आईस्क्रिम म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. सामान्यपणे आईस्क्रिम खाल्ल्यावर आपण आईस्क्रिमची काठी फेकून देतो. तसं या काठीपासून बरंच काही बनवता येतं. पण याचा मोठा फायदा टॉयलेटमध्येही आहे. एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. ज्यात आईस्क्रिमची एक छोटीशी काठी तुमचं टॉयलेटमधील असं काम करेल, जे करताना तुम्हाला घाण वाटते.
गृहिणींकडे बरेच किचन जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा अजब किचन जुगाड, ज्यात तिने आईस्क्रिमच्या काठीचा टॉयलेटमध्ये वापर करून दाखवला आहे. हा जुगाड कदाचित तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीही करून पाहाल. आता तिने नेमकं काय केलं आहे ते पाहुयात.
advertisement
व्हिडीओत पाहू शकता महिलेने एक आईस्क्रिमची काठी घेतली आहे. त्याच्या एका टोकावर तिने डबल साइड टेप लावली आहे. आता ही स्टिक ती टॉयलेटमध्ये घेऊन जाते. टॉयलेट सीट कव्हरच्या खाली तुम्हाला ही काठी घट्ट लावायची आहे. हे तुमचं घरगुती होल्डर तयार झालं. म्हणजे तुम्ही टॉयलेट कव्हर वरखाली करण्यासाठी याचा उपयोग करू शकता.
advertisement
एरवी हातांनी टॉयलेट सीट कव्हर वरखाली करताना घाण वाटते. पण यामुळे आता तुम्हाला ते अधिक सोपं झालं आहे, शिवाय तुमचे हातही घाण होणार नाही.
SEEMA FAMILY VLOG युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
April 13, 2024 8:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : आईस्क्रिम खाल्ल्यानंतर काठी फेकू नका; टॉयलेटमध्ये मोठा फायदा