Kitchen Jugaad Video : भांडी घासण्याची नवी पद्धत; काटा चमच्याने होतील स्वच्छ

Last Updated:

झटपट भांडी कशी घासावीत, यासाठी बऱ्याच ट्रिक आहेत. पण काटा चमच्याने भांडी घासायची ट्रिक आजवर तुम्ही कधी पाहिली नसेल किंवा कुणाला तुम्ही सांगितली, दाखवली नसेल. आता काटा चमच्याने भांडी कशी घासायची ती पाहुयात.

किचन जुगाड
किचन जुगाड
मुंबई : किचनमधील सर्वात कंटाळवाणं काम कोणतं असं विचारलं तर साहजिकच अनेक जण म्हणतील भांडी घासणं. स्वयंपाक करायला काही हरकत नाही. पण त्यानंतर भांड्यांचा ढिग साचतो आणि ती घासावी लागतात ते नकोसं वाटतं, असं अनेक महिलांचं होतं. पण आता भांडी घासण्याची एक नवी पद्धत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
आजवर तुम्ही भांडी कशाने घासली आहेत, साहजिकच साबण आणि स्क्रबरने पण कधी काटा चमच्याने भांडी घासलीत का? हो तोच काटा चमचा जो आपण खाण्यासाठी वापरतो. आता काटा चमच्याने भांडी कशी काय घासायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका गृहिणीने काटा चमच्याने भांडी कशी घासायची, हे दाखवलं आहे. या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
advertisement
काटा चमच्याने कशी घासायची भांडी
झटपट भांडी कशी घासावीत, यासाठी बऱ्याच ट्रिक आहेत. पण काटा चमच्याने भांडी घासायची ट्रिक आजवर तुम्ही कधी पाहिली नसेल किंवा कुणाला तुम्ही सांगितली, दाखवली नसेल. आता काटा चमच्याने भांडी कशी घासायची ती पाहुयात.
advertisement
तुम्ही पाहिलं असं काही वेळा काही भांडी इतकी खराब झालेली असतात किंवा त्यांचे कोपरे इतके खराब असतात की कितीही घासले तरी ते स्वच्छ होत नाही. अशावेळी काटा चमचा तुमच्या उपयोगी ठरेल.
जिथं स्क्रबर पोहोचत नाही तिथं काटा चमचा पोहोचतो. भांड्यांच्या कोपऱ्यांमध्ये काटा चमच्यातील काटे टाकून तुम्ही हा भाग स्वच्छ करू शकता. यामुळे तुमची भांडी सहजरित्या पूर्णपणे स्वच्छ होतील.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
P D vlogs युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : भांडी घासण्याची नवी पद्धत; काटा चमच्याने होतील स्वच्छ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement