Kitchen Jugaad Video : एका मिनिटात एक किलो कांदे कापा; नवी पद्धत एकदा पाहाच
- Published by:Priya Lad
Last Updated:
एक-दोन कांदे चिरेपर्यंतच डोळ्यातून पाणी निघू लागतं. मग किलोभर कांदे एकाच वेळी चिरायचे असतील तर... कल्पना करूनच नकोसं वाटतं आहे. पण एक किलो कांदे तुम्हाला एका मिनिटात चिरता येतील असं सांगितलं तर...
नवी दिल्ली : स्वयंपाकघरात सर्वात कठीण किंवा नको वाटणारं काम कोणतं? असं विचारलं तर अनेकांचं उत्तर असेल ते म्हणजे कांदे कापणं. कांदे कापणं किंवा चिरणं तसं थोडं त्रासदायकच काम. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं, शिवाय अनेकांना कांद्याचा वास सहन होत नाही. त्यामुळे कधी एकदा कांदे चिरून मोकळे होतो असं होतं. झटपट कांदा चिरण्याचा किचन जुगाड आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
एक-दोन कांदे चिरायचे असतील तेव्हा ठिक. पण भरपूर अगदी किलोभर कांदे एकाच वेळी चिरायचे असतील तर... कल्पना करूनच नकोसं वाटतं आहे. एक-दोन कांदे चिरल्यावरच डोळ्यातून पाणी गळू लागतं पण किलोभर कांदे एकाच वेळी चिरायचे म्हटलं तर काय होईल, शिवाय किती वेळ जाईल, पण एक किलो कांदे तुम्हाला एका मिनिटात चिरता येतील असं सांगितलं तर... अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही पण एका महिलेनं हा जबरदस्त असा उपाय दाखवला आहे.
advertisement
एका गृहिणीने एका मिनिटात एक किलो कांदा चिरण्याची ट्रिक दाखवली आहे. तिनं कांदा चिरण्याची नवी पद्धत दाखवली आहे. तिच्या या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
एक किलो कांदा एका मिनिटांत कसा चिरायचा?
यासाठी महिलेनं दोन पद्धती दाखवल्या आहेत, एक म्हणजे पीलर वापरून आणि दुसरी म्हणजे किसणी वापरून. पीलर जे आपण फळं-भाज्यांची सालं काढण्यासाठी वापरतो, त्याने तुम्ही कांदाही चिरू शकता. कांद्याची साल काढून तो अर्धा कापा आणि साली सोलाव्यात तशा कांदा चिरा. दुसरं म्हणजे कांदा निम्मा कापून तो किसणीवर बटाट्याच्या चकत्या करायच्या भागावर कापा किंवा बटाटाच्या चकत्या करण्यासाठी जी किसणी वापरता त्यावर घासा. बारीक कांदा हवा तर तुम्ही पीलरने कापू शकता आणि कांद्याच्या चकत्या हव्यात तर तुम्ही किसणीवर किसू शकता.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
अशा पद्धतीने तुम्ही एका मिनिटात एक किलो कांदे चिरू शकता असा दावा या महिलेनं केला आहे. युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
तुम्ही ही ट्रिक आजमावून पाहा आणि एका मिनिटात खरंच इतके कांदे चिरता येतात का, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कांदा झटपट चिरण्यासाठी तुम्ही कोणती ट्रिक वापरता तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा.
advertisement
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
First Published :
September 04, 2024 7:40 AM IST