या दोन भावांना अशीच क्रेझ होती, त्यामुळे त्यांनी कारचं रूपांतर हेलिकॉप्टरमध्ये करायचं ठरवलं. उत्तर प्रदेशातल्या आंबेडकरनगरमध्ये दोन भावांनी मारुती सुझुकी वॅगनआरचं जवळपास हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर केलं होतं; पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि भलतंच घडलं.
यानंतर हेलिकॉप्टरमध्ये रूपांतरित झालेली वॅगन आर आंबेडकरनगर पोलिसांनी जप्त केली. या भावांनी मॉडिफिकेशन करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करून गाडी जप्त केली. 'एक मॉडिफाइड कार जप्त करण्यात आली आहे. ती पूर्वपरवानगीशिवाय मॉडिफाय करण्यात आली होती. एमव्हीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे,' असं आंबेडकरनगरचे एएसपी विशाल पांडे म्हणाले.
advertisement
मॉडिफिकेशन करणाऱ्या दोन्ही भावांनी वॅगन आर कारमध्ये खूप मोठे बदल केले आहेत. कारच्या छतावर रोटर सिस्टीम बसवण्यात आली होती आणि मागच्या भागाचं डिझाइन हेलिकॉप्टर टेलप्रमाणे करण्यात आलं होतं; पण त्यांचा हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगून कारवाई केली. पोलीस ठाण्याच्या आत उभ्या असलेल्या वॅगनआर-कॉप्टरचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. ही कार हुबेहुब हेलिकॉप्टरसारखी दिसतेय. पोलीस स्टेशनमध्ये उभी असलेली ही हेलिकॉप्टर कार बघण्यासाठी लोक येत आहेत. या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसतंय की हेलिकॉप्टर बनविण्यासाठी जुन्या वॅगनआर मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. यात हेलिकॉप्टरसारखी टेल आणि रूफवर रोटर ब्लेड्स लावण्यात आली आहेत. सध्याच्या स्थितीत ते कारवजा हेलिकॉप्टर उडण्यास सक्षम असेल असं दिसत नाही; पण या दोन्ही भावांनी त्यांचं भन्नाट डोकं वापरून खूप क्रिएटिव्हिटी दाखवली आहे, हे मात्र नक्की. त्यांनी परवानगी घेऊन हे करायला हवं होतं, असं मत व्यक्त होत आहे.