उंदीर पळवण्याचा जबरदस्त असा जुगाड. या जुगाडामुळे पुढील 5 वर्षे उंदीर घरात दिसणार नाही, असा दावा हा जुगाड करणाऱ्या आणि दाखवणाऱ्या महिलेने केला आहे. उंदीरच नाही तर पाल आणि झुरळंही पळतील, असंही या महिलेनं सांगितलं आहे.
महिलेने घरातील बेसिक वस्तूंचा वापर करून एक केमिकल तयार केला आहे. ज्यामुळे आपल्याला नुकसान होणार नाही आणि उंदीर कायमचे पळून जातील, असं महिला म्हणाली.
advertisement
Kitchen Jugaad Video : उंदीर घरात येणं दूर, घराचा रस्ताच विसरतील, 100 टक्के परिणामकारक उपाय
महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार एका वाटीत किंवा एका छोट्या भांड्यात आलं किसून घ्या, त्यात अर्धा किंवा एक चमचा लिंबू रस टाका आणि पीठ टाका. गव्हाचं, तांदळाचं, बेसनचं कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकता. आता एक मोठा चमचा मीठ टाका. खडं मीठही चालेल. सैंधव मीठ वापरायचं.
आता कोणतीही टाल्कम पावडर, नारळ तेल टाका. उंदरांना काही वास आवडत नाही. त्यामुळे उंदीर गोळ्यांकडे आकर्षित होणार नाहीत. असे वास असतील तर ते टाल्कम पावडर आणि नारळ तेलामुळे येणार नाहीत. पातळ मिश्रण नको आहे त्यामुळे हळूहळू पाणी टाकून मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करा.
आता बटाटा घ्या. व्हिडीओत दाखवल्यानुसार बटाटे कापा आणि त्याच्या मधे होल करा. त्यात पिठाचा एक एक गोळा भरा. यावर साखर टाका, शेंगदाणा किंवा बिस्किटाचा तुकडा लावला बटाट्याऐवजी
बटाटा लागणार नाही. छोट्या आकाराचा घ्या खराब टोमॅटो, भेंडी, शिमला मिरची अशी कोणतीही खराब झालेली फळभाजी चालेल. आता यावर साखर टाका, शेंगदाणा किंवा बिस्किटाचा तुकडा लावाा. अशीच औषधं, कणकेचे गोळे उंदीर खाणार नाहीत. पण असं गोळ्यावर शेंगदाणे वगैरे लावून ठेवेल तर उंदीर त्याकडे आकर्षिक होतात. आता हे गोळे जिथं कोपरे आहेत किंव उंदीर जास्त येतात अशा ठिकाणी ठेवा.
Kitchen Jugaad Video : रेशनचे तांदूळ तेलात टाकून तर बघा, कमालच झाली
शक्यतो रात्री झोपण्याच्या आधी हा उपाय करा, म्हणजे रात्री लाईट बंद होतात तेव्हा उंदीर बाहेर पडतात त्यावेळी हा उपाय कामी येईल. हेच गोळे तुम्ही घराच्या बाहेरही ठेवू शकता. म्हणजे बाहेरच उंदीर बाहेरच्या बाहेरच जातील ते घरात येणार नाहीत. कारण बऱ्याचदा असं होतं, घरातील उंदीर घराच्या बाहेर जातात पण बाहेरील उंदीर पुन्हा घरात येतात.
@Puneritadka या युट्युब अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या जुगाडाची हमी न्यूज18मराठी देत नाही. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.