वॉशिंग मशीनमध्ये प्लॅस्टिक पिशवी वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण याचा फायदा पाहाल तर तुम्हीसुद्धा वॉशिंगमशीनमध्ये पिशवी टाकाल. आता वॉशिंग मशीनमध्ये पिशवी टाकल्याने नेमकं काय होतं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग ही संपूर्ण प्रोसेस पाहुयात.
Kitchen Jugaad Video : वॉशिंग मशीनमध्ये तेल टाकताच कमाल झाली
तुम्हाला करायचं काय आहे तर वॉशिंगमधील कपडे जेव्हा तुम्ही ड्रायरला टाकता तेव्हा थोडे कपडे आणि मग त्यावर प्लॅस्टिक पिशवी, पुन्हा त्यावर थोडे कपडे आणि पुन्हा प्लॅस्टिक पिशवी अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. कपडे ड्राय झाल्यानंतर तुम्ही झाकण उघडून पाहाल तर तुम्हाला मशीनमधी कपडे मोकळे मोकळे दिसतील. एरवी मशीनमध्ये कपडे टाकल्यानंतर ते एकमेकांमध्ये गुंतत किंवा अडकत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण अशा पद्धतीन मशीनमध्ये प्लॅस्टिक पिशवी टाकल्याने कपडे गुंतत नाहीत असा दावा या महिलेने केला आहे.
advertisement
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना काय काळजी घ्यायची?
प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असणं ही एक सामान्य गोष्ट आहे. मशीनने कपडे धुण्याने श्रम तर वाचतातच पण कपडे व्यवस्थित स्वच्छ होतात. पण इथे हेही जाणून घेणं गरजेचं आहे की मशीनने कपडे धुणं हीसुद्धा एक कला आहे. मशीनची काळजी न घेतल्यास ते खराब व्हायला वेळ लागणार नाही. यासोबतच योग्य प्रकारे वापर न केल्यास कपडेही स्वच्छ निघत नाहीत. आज आपण मशीनमधून कपडे स्वच्छ धुवून निघावे यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत.
कपड्यांना कॅटेगिरीमध्ये विभागा : वॉशिंग मशीनमध्ये कपडे घालण्यापूर्वी ते कॅटेगरीनुसार वेगळे करा, म्हणजे कमी घाणेरडे कपडे वेगळे ठेवा, जास्त घाणेरडे आणि हट्टी डाग असलेले कपडे वेगळे ठेवा. याशिवाय तुमचे नवीन कपडे वेगळे ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांची चमक आणि रंग खराब होणार नाही.
वॉशिंग पावडर डायरेक्ट टाकू नका : वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना नेहमी लक्षात ठेवा की, कपड्यांवर कधीही वॉशिंग पावडर टाकू नका. प्रथम कपडे आणि पाणी मशीनमध्ये ठेवा आणि मगच डिटर्जंट घाला. कपडे धुण्याची ही पद्धत वापरून पहा
छोटे कपडे आधी धुवा : तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये मोजे आणि रुमाल धुत असाल तर हे छोटे कपडे आधी धुवा. अन्यथा, मोठ्या कपड्यांमध्ये ते व्यवस्थित स्वच्छ केले जाऊ शकत नाही. यासोबतच कपड्यांचे हुक आणि झिप बंद केल्यानंतरच कपडे धुवावेत.
शर्टची बटणं बंद करून मशीनमध्ये टाकू नका वॉशिंग मशीनमध्ये शर्ट धुताना हे लक्षात ठेवा की, शर्टची बटणे बंद करून कधीही मशीनमध्ये ठेवू नका. त्यामुळे बटणांची शिलाई कमकुवत होऊन बटणाची छिद्रे मोठी होतात. त्याच वेळी, बटण तुटण्याची अधिक शक्यता असते.
Kitchen Jugaad Video : साबणात खिळा, भांडी धासण्याची नवीन पद्धत पाहून थक्क व्हाल
नवीन कपडे धुवायचे असतील तर त्या कपड्यांचा रंग फिका पडतो की नाही हेच कळत नाही. अशा परिस्थितीत प्रथम त्यांना पाण्यात वेगळे भिजवावे. तसेच, ते तुमच्या जुन्या कपड्यांसह धुवू नका आणि ते मशीनमध्ये वेगळे ठेवा.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकताना एकदाच सर्व टाकू नका. ते एक एक करून टाका. मशीनमध्ये कपडे धुवायला टाकताना त्यात फक्त 80% टक्केच कपडे टाका. थोडी मशीन ही रिकामी ठेवा. असं केल्याने कपडे हे स्वच्छ निघतात. ते काढताना जास्त गुंता होणार नाही. सोबतच ते स्वच्छ निघतील.