Kitchen Jugaad Video : साबणात खिळा, भांडी धासण्याची नवीन पद्धत पाहून थक्क व्हाल

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : साबण वापरण्याआधी त्याला खिळा मारण्याचा फायदा एका महिलेनं दाखवला आहे. तिनं दाखवल्यानुसार साबणाच्या एका टोकात तुम्हाला खिळा टाकायचा आहे. खिळा आरपार जायला हवं.

News18
News18
नवी दिल्ली :  साबणाचा वापर आपण दररोज करतो. अंघोळ, कपडे आणि भांडी यासाठी आपण साबण वापरतो. पण तुम्ही साबणावर खिळा मारून पाहिला आहे. तुम्हाला हे विचित्र वाटेल. पण याचा मोठा फायदा आहे. साबणावर खिळा मारण्याचा हा जुगाड. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
साबण वापरण्याआधी त्याला खिळा मारण्याचा फायदा एका महिलेनं दाखवला आहे. तिनं दाखवल्यानुसार साबणाच्या एका टोकात तुम्हाला खिळा टाकायचा आहे. खिळा आरपार जायला हवं. यामुळे साबणाला छिद्र पडेल. आता या छिद्रात तुम्हाला एक दोरा टाकून तो बांधून घ्यायचा आहे.
advertisement
आता याचा फायदा काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर साबण असाच कुठेही पृष्ठभागावर ठेवला तर तो लवकर संपतो. पण असा लटकवून ठेवला तर तो वाया जाणार नाही.  तसं हात धुण्यासाठी हँडवॉश असतो. पण काही वेळा हँडवॉश संपतो तेव्हा किंवा आजही काही लोक हँडवॉशऐवजी साबणाचे तुकडे वापरतात. जे आपण वॉश बेसिनवर ठेवतो. पण मग तो घसरून बेसिनच्या आत किंवा खाली पडतो. अशावेळी ही ट्रिक फायद्याची ठरेल. तुम्ही साबणात अशी दोरी टाकून तो लटकवून ठेवू शकता. महिनाभर तुम्हाला तो वापरता येईल.
advertisement
भांडी घासण्याची नवीन ट्रिक
याच व्हिडीओमध्ये भांडी घासण्याची नवीन ट्रिकही दाखवली आहे. काही भांडी अशी असतात ज्यांच्यामध्ये हात जात नाही आणि ती आतून नीट स्वच्छ करता येत नाही. अशी भांडी घासण्यासाठी नवीन ट्रिक. अशा भांड्यांमध्ये थोडं साबणाचं पाणी किंवा लिक्विड डिशवॉशर आणि पाणी टाका. त्यानंतर त्यात स्टील स्क्रब टाका. आता चुंबक घ्या जो भांड्याच्या आत दिसत असलेल्या स्क्रबरवर बाहेरच्या बाजूने ठेवा. तुम्ही पाहाल जसं चुंबक हलवाल तसं भांड्याच्या आतील स्क्रबरही हलेल. महिलेने प्लॅस्टिक बाटलीच्या आत हा उपाय करून दाखवला आहे. अशा पद्धतीने तुम्ही अशी भांडी आतून नीट स्वच्छ करू शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : साबणात खिळा, भांडी धासण्याची नवीन पद्धत पाहून थक्क व्हाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement