Kitchen Jugaad Video : भांड्यांवर फक्त रांगोळी टाका, क्षणात चकाचक होतील, भांडी घासण्याचा सगळ्यात सोपा जुगाड

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : रांगोळीचा भांडी घासण्यासाठी वापर... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण या जबरदस्त जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात रांगोळीचा वापर होतो. दार, पाट, ताट याभोवती रांगोळी काढली जाते. पण याच सणासुदीच्या काळात किंवा एरवीही करता येईल असा रांगोळीचा वापर तो म्हणजे भांडी घासणं. रांगोळीचा भांडी घासण्यासाठी वापर... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण या जबरदस्त जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सणासुदीचा काळ म्हणजे घरात साफसफाई आलीच. आता काही दिवसात घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे. त्यामुळे घरोघरी अशी साफसफाई सुरूच आहे. आता साफसफाई म्हणजे भांडी घासणं आलं आणि भांडी म्हणजे जर्मन किंवा अॅल्युमिनिअमची भांडी आली. जी घासणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क असतो.
advertisement
जर्मन किंवा अॅल्युमिनिअमची भांडी घासण्यासाठी सामान्यपणे तारेची घासणी आणि काळा साबण वापरला जातो. पण त्यासाठीही भांडी खूप घासावी लागतात तेव्हाच ती चमकू लागतात. पण तुम्ही रांगोळीने अगदी झटपट ही भांडी चकाचक करू शकता.
advertisement
यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर जे भांडं किंवा डबा घासायचा आहे तो ओला करून घ्यायचा आहे. कोणतीही घासणी, साबण, लिक्विड वापरायचं नाही. फक्त एका भांड्यात रांगोळी घेऊन ती हाताला लावून भांड्यांवर हातानेच चोळायची आहे. पांढरी रांगोळी घेऊ नका, कलरची रांगोळी घ्या. कारण पांढरी रांगोळी जाड असते, ज्यामुळे डब्यांवर स्क्रॅचेस पडू शकतात. कलरची रांगोळी बारीक असते. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता डबा अगदी स्टिलच्या डब्यासारखा स्वच्छ चकचकीत झाला आहे.
advertisement
आता डब्याचं झाकण घ्या. तुम्ही यावर स्क्रब घासला की कशापद्धतीने स्क्रॅचेस पडतात हे महिलेने दाखवलं आहे. आता झाकणाला भांड्याचा साबण लावू नका, तर अंघोळीचा साबण वापरा. ही जुनी पद्धत आहे पण खूप प्रभावी आहे. अशा पद्धतीने जर्मनची भांडी तुम्ही घासू शकतात.
advertisement
@RutujaParhad17 युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला रांगोळीने भांडी घासायची ही ट्रिक माहिती होती का? नाही तर ही ट्रिक कशी वाटली? तुम्ही भांडी घासण्यासाठी कोणती ट्रिक वापरता आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : भांड्यांवर फक्त रांगोळी टाका, क्षणात चकाचक होतील, भांडी घासण्याचा सगळ्यात सोपा जुगाड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement