advertisement

Insta वर मुलं काय पाहात आहेत? सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा, पालकांची झोप उडवणारी माहिती समोर

Last Updated:

सोशल मीडियाच्या या झगमगत्या दुनियेमागे एक काळं सत्य लपलेलं आहे, जे नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालाने उघड केलं आहे. मेटा (Meta) कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्षणातून (Meta Users Survey) जी माहिती समोर आली आहे, ती कोणत्याही पालकाची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या काळात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्या हातात असतो. त्यातही सोशल मीडिया म्हणजे लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. मुलं तासनतास इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्यात किंवा मित्रांशी चॅटिंग करण्यात मग्न असतात. "मुलं घरातच आहेत ना, मग सुरक्षित आहेत," असा एक गोड गैरसमज अनेक पालकांचा असतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या मुलाच्या स्क्रीनवर नक्की काय दिसतंय?
सोशल मीडियाच्या या झगमगत्या दुनियेमागे एक काळं सत्य लपलेलं आहे, जे नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालाने उघड केलं आहे. मेटा (Meta) कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्षणातून (Meta Users Survey) जी माहिती समोर आली आहे, ती कोणत्याही पालकाची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे.
दर 5 पैकी एका मुलासोबत घडतोय 'हा' प्रकार
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, इन्स्टाग्राम आणि मेटाच्या इतर प्लॅटफॉर्म्सवर 13 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीने स्वतः केलेल्या सर्वेक्षणात असं आढळलं की, 19 टक्के किशोरवयीन मुलांना (Teenagers) इन्स्टाग्रामवर अशा अश्लील किंवा नको असलेल्या फोटोंचा सामना करावा लागला, जे त्यांना बघायचे नव्हते. साध्या भाषेत सांगायचं तर, दर पाच मुलांमागे एका मुलाने अवांछित 'न्यूड' फोटो किंवा अश्लील मजकूर पाहिल्याची कबुली दिली आहे.
advertisement
फक्त अश्लीलताच नाही, तर जीवाचा धोकाही
हा सर्व्हे केवळ फोटोंपुरता मर्यादित नाही. काही मुलांनी असंही सांगितलं की, त्यांच्या फीडवर किंवा मेसेजमध्ये स्वतःला इजा करून घेणे (Self-harm) किंवा आत्महत्येसारख्या घातक गोष्टींना प्रोत्साहन देणारा मजकूरही समोर आला. लहान वयात अशा गोष्टी पाहिल्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या वागणुकीत टोकाचे बदल घडून येऊ शकतात.
advertisement
फेसबुक आणि इन्स्टाग्राम खरंच सुरक्षित आहेत का?
मेटा कंपनीने गेल्या काही काळात 'सेंसिटिव्ह कंटेंट कंट्रोल' सारखे अनेक फिचर्स आणले आहेत. मात्र, हा नवा डेटा सांगतो की हे फिचर्स जमिनीवर किती कुचकामी ठरत आहेत. इन्स्टाग्राम असो वा फेसबुक, मुलांसाठी हे प्लॅटफॉर्म्स आता पूर्वीसारखे सुरक्षित राहिलेले नाहीत, असा दावा चाईल्ड राईट्स ॲक्टिव्हिस्ट्स करत आहेत.
advertisement
कंपनीची बाजू आणि मर्यादा
या प्रकरणावर मेटाने स्पष्टीकरण दिलं आहे की, ते मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर आहेत. संशयास्पद लोकांशी होणाऱ्या चॅटिंगवर निर्बंध आणि आक्षेपार्ह फोटो ओळखण्यासाठी टूल्स बसवले आहेत. मात्र, अनेकदा हा मजकूर 'प्रायव्हेट मेसेज' द्वारे पाठवला जातो, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा (Privacy) विचार करता तो पूर्णपणे रोखणे तांत्रिकदृष्ट्या कठीण जाते.
पालकांनो, आता तुमची जबाबदारी वाढली आहे
तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी चुकीचा मजकूर पसरवणारे लोक नवीन मार्ग शोधून काढतातच. अशा वेळी केवळ कंपनीवर विसंबून राहणे धोक्याचे आहे. तज्ज्ञांच्या मते, पालकांनी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:
advertisement
मुलांशी संवाद साधा: सोशल मीडियाच्या धोक्यांबाबत मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगा.
ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवा, मुलं कोणाशी बोलतात आणि काय पाहतात, याकडे पालकांचं कडक नजर हवी.
प्रायव्हसी सेटिंग्स तपासा: मुलांच्या अकाउंटवर जास्तीत जास्त 'रिस्ट्रिक्शन्स' आणि 'सॉफ्टवेअर फिल्टर' लावा.
डिजिटल युगात गोपनीयतेचा हक्क महत्त्वाचा आहेच, पण आपल्या मुलांचे बालपण आणि मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवणे त्याहूनही मोठे आव्हान आहे. सावधगिरी हाच या संकटावरचा एकमेव उपाय आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Insta वर मुलं काय पाहात आहेत? सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा, पालकांची झोप उडवणारी माहिती समोर
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement