भांडी घासायची म्हणजे त्यासाठी घासणी किंवा स्क्रबर, लिक्विड किंवा साबण लागतो. पण यापैकी एकाचाही वापक न करता किंबहुना हातांनीही न घासता तुम्ही भांडी घासू शकता. हे वाचूनच तुम्हाला हलकं वाटलं असेल. आता हे कसं काय? हे पाहण्याची उत्सुकताही असेल.
तेल न वापरता वडे, तेलाची बचत आणि हेल्दीही, बनवायचे कसे पाहा Kitchen Jugaad Video
advertisement
एका महिलेने युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ. ज्यात तुम्ही पाहू शकता महिलेने एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलं आहे. त्यात ती स्टिलची भांडी फक्त बुडवून फिरवते आणि बाहेर काढते. याचा रिझल्ट पाहून तुमचेही डोळे चमकतील. भांडी अगदी चकाचक झालेली दिसतील. महिलेने भांडी पाण्यात बुडवायच्या आधी जे डाग किंवा धूळ त्यावर होती ती क्षणात गायब झाल्याचं दिसतं.
महिलेने सांगितल्यानुसार पाण्यात भांडी टाका फिरवून घ्या, एका कापडाने पुसून घ्या. साध्या पाण्यात धुवून घ्या. तुम्ही पाहाल तर डबा न घासता फक्त पाण्यात बुडवून चकाचक झाला आहे.
आता हे जादुई पाणी नेमकं कसलं? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे पाणी तुम्ही घरीच बनवू शकता. ते कसं हेसुद्धा या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. तर करायचं काय, एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्यायचं. त्यात एक चमचा सायट्रिक अॅसिड ज्याला लिंबू सत्वही म्हणात. हे नसेल तर एक लिंबू पिळून टाका. नंतर एक चमचा खायचा सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर टाका. मिक्स करून घ्या. एकदम चिकट झालेली भांडी असतील तर ती या पाण्यातून लगेच काढू नका. पाण्यात थोडा वेळ ठेवा.
Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये मीठ ठेवताच चमत्कार, हजारो रुपये वाचतील
भांडी घासण्याचा हा असा जुगाड ज्यामुळे मेहनत आणि वेळ दोन्ही वाचतील. या पद्धतीने तुम्हाला भांडी घासण्यासाठी कुणाची मदत लागणार नाही. तुम्ही एकट्याने घरातील सगळी भांडी या पद्धतीने धुवू शकता. तुम्हीही दिवाळीची साफसफाई काढली असेल तर हा जुगाड करून पाहा आणि खरंच व्हिडीओ दाखवल्यानुसार त्याचा परिणाम आहे की नाही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंटमध्ये नक्की सांगा.