औषधाच्या गोळ्या ज्या आपण आजारपणातून बरं होण्यासाठी वापरतो. पण या गोळ्यांचा असा अनोखा वापर तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल. गोळ्या एक्सपायर झाल्या की आपण त्या फेकून देतो. पण त्याऐवजी तुम्ही त्याचा असा वापर करू शकता. औषधाच्या गोळीने फुटलेली प्लॅस्टिकची भांडी चांगली करू शकता. आता हे कसं काय शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका महिलेने या किचन जुगाडचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता नेमकं काय करायचं ते पाहुयात.
advertisement
Kitchen Jugaad Video : रात्रभरात सगळी झुरळं गायब होतील, पुन्हा दिसणार नाहीत, तेलाची कमाल
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेने प्लॅस्टिकची बादली घेतली आहे. बादलीच्या तळाचा थोडासा भाग तुटला आहे. महिला हा भाग औषधाच्या गोळीने चिकटवून दाखवते. आता ते कसं? तर महिलने गोळ्यांची पूड करून घेतली. त्यानंतर बादलीचा तुटलेला भाग तो जिथून तुटला आहे तिथं ठेवला. तो आधी फेव्हिक्विकने जोडला नंतर तिथं तिनं औषधांच्या गोळ्यांची पावडर टाकली आणि पुन्हा त्यावर फेव्हिक्विक लावलं.
महिलेने सांगितल्यानुसार जसं पीओपी असतं अगदी तसंच हे होतं. महिलेने बादलीत पाणीही ओतून दाखवलं आहे. ज्यात तुटलेला भाग औषधाच्या गोळीने जोडल्यानंतर त्यातून एकही थेंब पाणी येत नाही असं दिसतं.
Kitchen Jugaad Video : प्लॅस्टिक पिशवीने कपडे धुण्याची पद्धत, धोबीलाही माहिती नाही हे सीक्रेट
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुटलेली भांडी जोडण्यासाठी तुम्ही काय जुगाड करता किंवा तुमच्याकडे असा काही वेगळा जुगाड असेल तर त्याबाबतही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये माहिती द्या.