झुरळांना पळवण्यासाठी अगदी घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये काही वेळात कमी खर्चात होणारा असा हा उपाय आहे. यासाठी तुम्हाला पाणी, लवंग, लसूण, कापूस, पॅरासिटामोल गोळी आणि स्प्रे बॉटल किंवा साधी बॉटल लागेल.
आता करायचं काय आहे तर फुलं असतील अशाच लवंग घ्यायच्या आहेत. 10-15 लवंग साध्या पाण्यात एक तासभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ भिजवून ठेवली तरी चालेल. तासाभराने पाहाल तर पाण्याचा रंग बदललेला दिसेल कारण यात लवंगाचा अर्क उतरला आहे.
advertisement
आता एक पॅरासिटामोल टॅबलेट घ्या. त्याची पावडर बनवून ध्या लवंग टाकलेल्या पाण्यात ही पावडर टाका. लसणीच्या पाकळ्या घ्या. लसूण सोलून चांगली ठेचून लवंग घातलेल्या पाण्यात टाका. 5 ते 10 मिनिटं असंच ठेवा, जेणेकरून लसणीचा अर्क त्या पाण्यात उतरेल. आता यात अर्धा ग्लास साधं पाणी टाका. 2-3 थेंब डेटॉल, अर्धा झाकण व्हिनेगर टाका. नीट मिक्स करा.
नंतर हे पाणी गाळून घ्या. त्यातील लसूण लवंग वेगळी होतील. लवंग आणि लसणीचा वास झुरळांना आवडत नाही एकदा हा उपाय केला की घरातील सगळे झुरळं पळून जातील. आयुष्यभर एकही झुरळ दिसणार नाही.हा उपाय 100 टक्के काम करतो, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे.
3 पद्धतीने वापरा
आता ते कसं, तर हे मिश्रण तुम्ही तीन पद्धतीने वापरू शकता. पहिलं म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटल नसेल तर साधी प्लॅस्टिक बाटली घ्या, त्याच्या झाकणांवर छिद्र पाडा. ही तुमची स्प्रे बॉटल तयार. बॉटलीमध्ये मिश्रण घराच्या कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
दुसरी पद्धत म्हणजे कापूस घ्या ते हे मिश्रण वाटीत घेऊन त्यात कापूस भिजवा. रात्रीच्या वेळी झोपण्याआधी किचन सिंकच्या जाळीवर, गॅसवर, डबे ठेवता तिथं ठेवा. तिसरी पद्धत म्हणजे बादलीत पाणी घेऊन त्यात हे मिश्रण टाका आणि या पाण्याने फरशी पुसून घ्या.
Kitchen Jugaad Video : वॉशिंग मशीनमध्ये तेल टाकताच कमाल झाली
हे झुरळांना पळवण्याचं पॉवरफुल असं लिक्विड आहे, जे घरीच बनवण्यात आलं आहे. हा उपाय 100 टक्के परिणामकारक आहे. एकदा केला की आयुष्यभर झुरळं घरात येणार नाहीत, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
Poonam Ki Rasoi and tips युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.