फ्रिजमध्ये पैसे ठेवण्याचा असा जबरदस्त जुगाड तुम्ही विचारही केला नसेल. आता फ्रिजमध्ये पैसे ठेवायचा म्हणजे ओल्या नोटा ठेवायच्या. बऱ्याचदा कपडे धुताना खिशात पैशांच्या नोटा तशाच राहतात आणि कपडे धुताना ते ओले होतात किंवा पावसात पैसे भिजतात. अशा वेळी फ्रिजमध्ये पैशांचा जुगाड तुमच्या कामी येईल.
Kitchen Jugaad : कशाला हवा डिशवॉशर, कुकरमध्येच भांडी होतील चकाचक, कसं ते पाहा VIDEO
advertisement
ओले पैसे ट्रे किंवा ताटात ठेवा आणि फ्रिजमध्ये ठेवा. एक तासाभराने फ्रिज उघडा आणि या नोटा बाहेर काढा. तुम्हाला लगेच पैसे नको असतील तर एक रात्र नोटा फ्रिजमध्ये ठेवल्याच तरी हरकत नाही.
तासाभराने फ्रिज उघडल्यावर तुम्ही पाहाल तर ओल्या नोटा करकरीत सुकलेल्या दिसतील. तसं आपण उन्हात किंवा इस्त्री फिरवून नोटा सुकवू शकतो. पण उन्हात बाहेर नोटा उडण्याची शक्यता असते आणि इस्रीमुळे वीज वाया जाते. पण फ्रिज तसाही चालूच असतो, त्यामुळे नोटा सुकवण्याचा हा जुगाड जबरदस्त आहे.
Simply marathi युट्यूब चॅनेलवर या किचन जुगाडाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Kitchen Jugaad Video : एकदा तरी चप्पल किसणीवर घासा, टळेल मोठा धोका
(सूचना : या लेखातील माहिती सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. कोणत्याही नुकसानीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नाही.)