वॉशिंग मशीनमध्ये तेल वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण एकदा हा जुगाड तुम्ही पाहाल तर तुम्हीही हा पुन्हा पुन्हा कराल. आता वॉशिंग मशीनमध्ये तेल टाकून नेमकं काय करायचं, त्याचा फायदा काय? असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग व्हिडीओच पाहुयात.
Kitchen Jugaad Video : औषधांच्या बाटल्यांच्या झाकणांचा किचनमध्ये असा वापर, स्वयंपाक होईल सोपा
advertisement
महिलेने व्हिडीओ दाखवल्यानुसार मशीनच्या वर तुम्हाला खोबरेल तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत. त्यानंतर एक सॉफ्ट कापड किंवा रूमाल घ्यायचा आहे. हे तेल त्या कापडाच्या सहाय्याने मशीनवर सगळीकडे पसरवायचं आहे. मशीनचा मागील भाग जिथं वायर असतात तो भाग सोडून इतर तिन्ही बाजूंनीसुद्धा हीच क्रिया करायची आहे.
आता याचा फायदा काय तर व्हिडीओत तुम्ही पाहाल तेल लावण्याआधी आणि तेल लावण्यानंतरची मशीन यातील फरक स्पष्ट दिसेल. वॉशिंग मशीनवर पाण्याचे डाग पडतात. त्यामुळे पांढरे ठिपके दिसतात. हे कितीही घासलं किंवा स्क्रबर लावलं तर त्याच्यावर स्क्रॅच पडतात तसंच मशीनची चमकही जाते. पण अशा पद्धतीने मशीनवर तेल लावून ती पुसल्याने त्याच्यावरील डाग आणि स्क्रॅच दोन्ही गायब होतील. तसंच मशीनला चमकही येईल. अगदी ती नव्यासारखी दिसू लागेल. दिसायला छोटा असा जुगाड पण याचा फायदा मोठा आहे.
Kitchen Jugaad Video : चमच्याची कमाल! किलोभर लसूण सोला फक्त 5 मिनिटात, जादुई पद्धत नक्की पाहा
आता तुम्ही म्हणाल की यामुळे कपड्यांना तेल लागेल. तर महिलेने असं बिलकुल होणार नाही असा दावा केला आहे. तेल कपड्याने नीट स्वच्छ केलेलं आहे त्यामुळे ते कपड्यांना लागणार नाही असं ती म्हणाली. महिलेने आपण हा उपाय आठवड्यातून एकदा करत असल्याचं सांगितलं आहे.
@palpalrealvlog2879 या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. न्यूज18मराठीने हा फक्त माहितीसाठी दिला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कोणत्याही नुकसानीसाठी न्यूज18मराठी जबाबदार नाही.