Kitchen Jugaad Video : चमच्याची कमाल! किलोभर लसूण सोला फक्त 5 मिनिटात, जादुई पद्धत नक्की पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : तुम्ही कधी चमच्याने लसूण सोलून पाहिली आहे का? वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. पण एका महिलेने चमच्याने 5 मिनिटांत किलोभर लसूण सोलता येईल असा दावा केला आहे.
नवी दिल्ली : लसणीचा एक कांदा जरी सोलायचा म्हटला तरी त्यात किती वेळ जातो. हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. स्वंयपाक करणाऱ्या प्रत्येकाला यासाठी लागणारी मेहनत आणि त्यामुळे होणारा त्रास माहितीच आहे. तशा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लसूण सोलण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक आहेत. पण लसूण सोलण्याची अशी ट्रिक जी तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल. ती म्हणजे चमच्याने लसूण सोलण्याची पद्धत.
तुम्ही कधी चमच्याने लसूण सोलून पाहिली आहे का? वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. पण एका महिलेने चमच्याने 5 मिनिटांत किलोभर लसूण सोलता येईल असा दावा केला आहे. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महिलेने हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे.
advertisement
यासाठी काय करायचं आहे. तर एक कापड घ्या, कॉटन कपडा किंवा रूमाल वापरू शकता. एकदम मुलायम कपडा घ्यायचं नाहीये. जितकं खरखरीत कापड असेल तितकं चांगलं. आता चमच्यात तेल घ्या. चमचाभर तेल लसणीत टाकून सगळ्या लसणींना नीट हातांनी चोळून घ्या. आता हा तेल लावलेला लसूण तुम्ही घेतलेल्या कापडावर टाका. कापड गुंडाळून घ्या आणि पीठ मळतो तसं लसूण कापडामध्ये चोळून घ्या.
advertisement
आता तुम्ही कापड उघडून पाहाल तर लसणीच्या साली निघालेल्या दिसतील, काही लसणीच्या साली सैल झालेल्या दिसतील ज्या तुम्ही हातांनी सहज काढू शकता. साली निघालेला लसूण हातांनी किंवा पाखडून काढून घ्या. आता ज्या लसणीच्या साली निघाल्या नसतील त्यासाठी पुन्हा हिच पद्धत वापरा.
advertisement
झटपट लसूण सोलण्याशिवाय याचा फायदा म्हणजे लसूण सोलताना नखं खराब होतात किंवा नखांची आग होते, या समस्या उद्भवणार नाही. आणखी एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल. लसूण सोलताना खूप कचरा होतो पण या पद्धतीने लसूण सोलाल तर बिलकुल कचरा होणार नाही.
advertisement
@Oveesketchen युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर चमच्याची कमाल! किलोभर लसूण सोला फक्त 5 मिनिटात, जादुई पद्धत, असं लिहिलेलं आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि तुम्ही किती वेळात लसूण सोललात, तुम्हाला लसूण सोडण्याचा हा जुगाड कसा वाटला? किंवा लसूण सोलण्यासाठी तुम्ही कोणता जुगाड करता, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
August 18, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : चमच्याची कमाल! किलोभर लसूण सोला फक्त 5 मिनिटात, जादुई पद्धत नक्की पाहा