एका महिलेने वापरलेल्या फुलांचा हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. जो पाहून तुम्हीसुद्धा हा जुगाड कराल. आता तुम्हाला करायचं काय आहे तर वापरलेली फुलं तव्यावर भाजायची आहेत. तुमच्याकडे कडक ऊन असेल तर तुम्ही ही उन्हातसुद्धा वाळवू शकता. तरी थोडी ओली राहिली तर तव्यावर भाजून घ्या. अगदी फुलं कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर भाजायची आहे. यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून कुस्करून घ्यायची आहेत. नंतर चाळून घ्या. त्याची पावडर एका बाजूला आणि मोठ्या मोठ्या राहिलेल्या पाकळ्या एका बाजूला ठेवा. आपल्याला दोन्ही वापर करायचा आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video : प्लॅस्टिक भांड्यांना होल, पावसाळ्यात प्रत्येकाने हे करायला हवं, मोठा फायदा
आधी एका भांड्यात पावडर घ्या. त्यात कापूर गोळी कुस्करून टाका. नंतर यात बाजारात मिळणारी एक धूप स्टिक किंवा तुम्ही चंदन पावडरही टाकू शकता. यानंतर तूप किंवा तेल टाकून हे मिश्रण नीट एकत्र करून घ्या. आता या मिश्रणातील थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावर घेऊन त्याला शंकूसारखा आकार द्यायचा आहे. काही मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोल, चपट्या अशा वाट्या करायच्या आहेत. हा तुमचा घरगुती धूप तयार झाला. शंकूसारखी धूप तुम्ही डायरेक्ट जाळू शकता तर गोल्, चपट्या धुपात एक कापूर ठेवून जाळा.
आता राहिला फुलांचा मोठा भाग तर तो एका मातीच्या भांड्यात घ्या. त्यात त्यात तमालपत्र आणि कापूर टाका. हे सकाळ-संध्याकाळ जाळलं तर याचा वापर डास घालवण्यासाठी होऊ शकता. घरात कुबट, दमट वास असेल तर तो दूर होईल. घरात सुगंध पसरेल.
Kitchen Jugaad Video : बस्सं फक्त एक नारळ, डास चावणं दूर घराच्या आसपासही फिरकणार नाहीत
@Puneritadka युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कचरा म्हणून तुम्ही फेकून देत असलेल्या फुलांचा असा वापर की तुमच्या पैशांचीही बचत होईल. तुम्ही तुमच्या घरातल्या वापरलेल्या फुलांचं काय करता, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.