TRENDING:

Kitchen Jugaad : चपातीला नारळाची शेंडी लावताच झाली कमाल; काय ते Video मध्येच पाहा

Last Updated:

आतापर्यंत तुम्ही चपाती बरोबर नारळाची चटणी खाल्ली असेल. पण कधी चपाती करताना नारळ वापरून पाहिला आहे का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चपाती करताना नारळाचा वापर, वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आतापर्यंत तुम्ही चपाती बरोबर नारळाची चटणी खाल्ली असेल. पण कधी चपाती करताना नारळ वापरून पाहिला आहे का? अशाच जबरदस्त किचन जुगाड चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने पोस्ट केला आहे व्हिडीओ. ज्यात तिने नारळाच्या एका भागाचा वापर चपातीवर करून दाखवला आहे. हा भाग म्हणजे नारळाची शेंडी.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

सामान्यपणे आपण नारळ फोडला ही खोबरं असलेला भाग ठेवतो, त्याची शेंडी फेकून देतो. पण महिलेने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार नारळाचा ही शेंडी खूप कामाची आहे. चपाती करताना तुम्हाला याचा मोठा उपयोग होईल. आता तो कसा ते पाहूयात.

Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठात साबण नक्की टाका; मोठा फायदा

करायचं काय?

आता तुम्हाला करायचा काय तर नारळाची शेंडी काढून घ्या. त्याची शेंडी एक असते, म्हणजे ते दोरे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ते सुटे करून घ्या. आता ते पुन्हा एकत्र करून एका दोरीने घट्ट बांधून घ्या. आता हा तुमचा घरगुती ब्रश तयार झाला.

advertisement

कसा करायचा वापर

याचा वापर तुम्ही डोसा बनवताना तव्यावर आणि चपाती करताना चपातीवर तेल लावण्यासाठी करू शकता. शिवाय तुम्ही याने चपाती तव्यावर फिरवू शकता, दाब देऊन चपाती फुलवूही शकता.

simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

Kitchen Jugaad : स्विचबोर्डला कांदा-टोमॅटो लावून तर पाहा; चकीत करणारा परिणाम

इथं पाहा व्हिडीओ

(सूचना - या लेखातील माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad : चपातीला नारळाची शेंडी लावताच झाली कमाल; काय ते Video मध्येच पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल