टीव्ही, मोबाईल यावर बातम्या वाचता, पाहता येत असल्या तरी आजही बऱ्याच लोकांच्या घरात दररोज न्यूजपेपर येतो. त्यांना न्यूजपेपर वाचण्याची सवय लागलेली असते. सामान्यपणे त्या दिवसाचा न्यूजपेपर वाचल्यानंतर तो जुना होतो. असे जुने न्यूजपेपर जमवून आपण त्याचा गठ्ठा तयार करतो आणि मग ते रद्दीत देतो किंवा न्यूजपेपरचा काही लोक आणखी काही कारणांसाठी वापर करतात. पण न्यूजपेपरचा आम्ही तुम्हाला असा एक वापर दाखवणार आहे, ज्याबाबत तुम्ही आजवर कधीच ऐकलं, पाहिलं नसेल.
advertisement
फ्रिजमध्ये न्यूजपेपर
फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याचा असा वापर कुणीच केला नसेल किंवा कुणाला माहितीही नसेल. फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवल्याने खूप मोठा फायदा होता. न्यूजपेपरच्या या साध्यासोप्या उपायाने तुमची खूप मोठी समस्या यामुळे दूर होईल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल ही तर कमालच झाली.
नेमकं करायचं काय?
ही महिला न्यूजपेपरचं एक पान घेते. त्याचा गोळा करते. तो ती पाण्यात भिजवून घेते. हा भिजवलेला न्यूजपेपरच्या पानाचा गोळा ती दुसऱ्या एका वाटीत ठेवते आणि ती वाटी फ्रीजमध्ये ठेवते.
फ्रिजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याचा फायदा काय?
महिलेने सांगितल्यानुसार या उपायामुळे फ्रीजमध्ये वास जातो. तुम्हाला माहिती असेल फ्रीजमध्ये काही पदार्थ ठेवल्याने त्या पदार्थांचा वास फ्रीजमध्ये येतो. फ्रीजमधील हा वास घालवण्यासाठी लोक काय काय नाही करत. प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय करतात. पण हा उपाय अगदी साधासोपा आहे. यात फार काही लागत नाही आणि फार मेहनत घेण्याचीही गरज नाही.
पिंक्स इनोव्हेशन या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम काय येतो, तो आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)