Kitchen Jugaad Video : नळातून येतंय गरम पाणी? करा हा जुगाड रणरणत्या उन्हातही टाकीतील पाणी थंडगार होईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
उन्हाळ्यात पिण्यासाठी लागणारं पाणी फ्रिज किंवा माठात ठेवून थंड करतो पण नळातून येणारं छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी थंड कसं ठेवायचा हा प्रश्न अनेकांसमोर असतो.
नवी दिल्ली : उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा वाहतात. अशावेळी वारंवार अंघोळ करावीशी, हातपाय, चेहरा धुवत राहावासा वाटतो. पण अंघोळ करायला गेलात किंवा हातपाय, चेहरा धुवायला गेलात की नळातूनही गरम गरम पाणी येतं. कारण छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी गरम होतं. हेच पाणी थंडगार ठेवण्याचा किचन जुगाड.
उन्हाळ्यात पिण्यासाठी लागणारं पाणी फ्रिज किंवा माठात ठेवून थंड करतो पण नळातून येणारं छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी थंड कसं ठेवायचा हा प्रश्न अनेकांसमोर असतो. टाकी सिमेंटची असेल तर त्यातील पाणी थंड असतं. पण प्लॅस्टिकची असेल तर ते पाणी उकळल्यासारखं गरम होतं. आता यावर पर्याय काय तर एक तर या टाकीवर शेड लावायचा नाहीतर टाकीच्या बाजूने भिंत बांधून घ्यायची, जेणेकरून टाकीवर ऊन पडणार नाही. पण हा फारच खर्चिक उपाय आहे. एका महिलेने यावर सोपा असा उपाय दिला आहे.
advertisement
उन्हात टाकीतील पाणी थंड कसं ठेवायचं?
यासाठी तुम्हाला लागेल ते थर्माकॉल, चिकटपट्टी, कैची आणि गोणपाट. आता तुम्हाला करायचं काय आहे, तर थर्माकॉल शीट्स तुम्हाला टाकीभोवती लावायच्या आहेत. चिकटपट्टीने त्या चिकटवा. यासाठी पातळ थर्माकॉल घ्यावं ते फार जाड नसावं. नाहीतर टाकीभोवती लावताना ते तुटू शकतं. आता या थर्माकॉल शीट्सवर गोणपाट टाका. ते पडू नये किंवा हवेने उडू नये म्हणून ते दोरीनं किंवा खराब वायरने बांधून घ्या.
advertisement
आता हे टाकीच्या भोवताली झालं. टाकीच्या वरचा म्हणजे झाकणाकडील भाग तर उघडाच आहे. आता यासाठी टाकीच्या वरच्या आकाराइतकं गोलाकार थर्माकॉल घ्या. त्यावरही गोणपाट चिकटवा आणि ते टाकीच्या झाकणावर ठेवा. यावर एखादं वजन ठेवा म्हणजे ते हलणार नाही किंवा हवेनं उडणार नाही. यावर पाणी शिंपडून ठेवा म्हणजे पाणी थंड राहिल.
advertisement
आता तुम्ही नळ उघडल्यावर सुरुवातीला त्यातून गरम पाणी येईल कारण पाइपमधील पाणी गरम असू शकतं पण त्यानंतर येणारं पाणी मात्र थंडगार असेल.
इथं पाहा व्हिडीओ
Maa, yeh kaise karun? युट्युब चॅनेलवर या जुगाडाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोळ मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
April 07, 2024 8:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : नळातून येतंय गरम पाणी? करा हा जुगाड रणरणत्या उन्हातही टाकीतील पाणी थंडगार होईल