Kitchen Jugaad Video : कुलरमध्ये टाका प्लॅस्टिक बाटली; वाचेल वीज, कमी येईल लाईट बिल

Last Updated:

उन्हाळ्यात पंखा, कुलर, एसी याच्या अधिक वापरामुळे लाइट बिलही बरंच येतं. पण कुलरमध्ये बाटली टाकून तुम्ही तुमचं लाइट बिल कमी करू शकता.

कुलरमध्ये प्लॅस्टिक बाटलीची कमाल (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
कुलरमध्ये प्लॅस्टिक बाटलीची कमाल (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
मुंबई : उन्हाळा म्हटलं की पंखा, कुलर, एसी, फ्रिज यांचा वापर जास्तच वाढतो. त्यामुळे या कालावधीत वीज जास्त वापरली जाते. परिणामी लाईट बिलही जास्त येतं. पण आम्ही तुमच्यासाठी आता हेच लाइट बिल कमी करण्याचा जबरदस्त जुगाड घेऊन आलो आहोत. तुम्ही विचारही केला नसेल. तुमच्याकडे असलेली एक साधी प्लॅस्टिकची बाटली तुमच्या विजेची बचत करू शकते. प्लॅस्टिकच्या बाटलीमुळे तुमचं लाईट बिल कमी होईल. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आता प्लॅस्टिक बाटली आणि विजेचा काय संबंध? प्लॅस्टिक बाटली वापरून वीज कमी कशी काय होईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका गृहिणीने या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तिने प्लॅस्टिक बाटलीचा वापर करून कमाल करून दाखवली आहे. तिने असा प्लॅस्टिक बाटलीचा असा वापर करून दाखवला आहे की तुमचं लाइट बिल कमी होईल. आता नेमकं काय करायचं ते पाहुयात.
advertisement
कुलरमध्ये बाटली टाकण्याआधी करा हे काम
तुम्हाला या प्लॅस्टिक बाटलीचा वापर करायचा आहे तो कुलरसाठी. पण त्यापूर्वी घरात कुलर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची दोन कामं करा. एक म्हणजे पंखा सुरू करा. यामुळे खोलीतील गरम हवा घराबाहेर जाईल. त्यानंतर पंखा बंद करा. दुसरं म्हणजे जिथं कुलर ठेवणार आहात, तिथली लाइट बंद ठेवा. कारण लाइटमुळे खोलीतील तापमान वाढतं. त्यामुळे कुलरलाही ती खोली थंड करायला वेळ जातो. परिणामी वीज जास्त लागते.
advertisement
कुलरमध्ये बाटली टाकल्यानंतर झाली कमाल
आता पाहुयात कुलरसोबत प्लॅस्टिक बाटलीचं काय करायचं? तुम्ही पाहिलं असेल जेव्हा तुमचा कुलर बंद असतो तेव्हा कुलरच्या मागे असलेली गवताची जाळी पूर्णपणे सुकते. जेव्हा कुलर सुरू करतो तेव्हा ती जाळी हळूहळू ओली होते आणि त्यानंतर कुलर हळूहळू थंड हवा देते. पण यासाठी खूप वेळ जातो आणि मग वीजही खूप जाते. त्यामुळे कुलर सुरू करण्याआधी एका प्लॅस्टिक बाटलीत पाणी घ्या आणि या सुकलेलया गवतावर  हे पाणी हळूहळू टाका. सुकलेलं गवत ओलं होईल. आता गवत ओलं करण्यासाठी कुलरला फार वेळ लागणार नाही. जेणेकरून कुलर लवकर थंड हवा देईल, फार वीज वापरणार नाही.
advertisement
यामुळे आपसूकच तुमची वीज कमी वापरली जाईल आणि लाइट बिलही कमी होईल. Avika Rawat Foods युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
advertisement
न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. पण तुम्ही हा जुगाड नक्की करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : कुलरमध्ये टाका प्लॅस्टिक बाटली; वाचेल वीज, कमी येईल लाईट बिल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement