TRENDING:

Kitchen Jugaad - भात-डाळ-भाजीच नव्हे तर कुकरने तुम्ही चपातीही बनवू शकता; कसं ते पाहा VIDEO

Last Updated:

कुकरवर चपाती बनवण्याचा जबरदस्त किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : प्रेशर कुकरमध्ये आपण भात, डाळ आणि भाजीही बनवू शकतो. पण तुम्ही कुकरमध्ये कधी चपाती बनवली आहे का? चपाती आणि कुकरमध्ये कशी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण कुकरचा वापर करूनही तुम्ही चपाती बनवू शकता. एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement

सामान्यपणे आपण चपाती शेकवण्यासाठी तव्याचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती नसेल कुकरवरही तुम्हाला चपाती शेकवता येईल. आता कुकरमध्ये चपाती कशी शेकवायची, असं तुम्ही म्हणाल. पण एकदा ही पद्धत तुम्ही पाहिली तर तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. जेव्हा कधी तवा नसेल तेव्हा तुम्हीही अशाच पद्धतीने कुकरवर चपाती शेकवाल.

Kitchen Jugaad Video - चपातीच्या पिठात नाणं टाकताच झाली कमाल; चुटकीत झालं मोठं काम

advertisement

व्हिडीओत गृहिणीने दाखवल्यानुसार तुम्हाला कुकर गॅसवर उलटा ठेवायचा आहे. त्याच्यावर चपाती शेकवायची आहे. तुम्ही पाहाल तर चपाती अगदी तव्यावर शेकते तशी कुकरवर शेकते आहे. यानंतर जशी तव्यावर एक बाजू भाजून दुसरी बाजू आपण गॅसवर भाजतो. अगदी तसंच इथंही करायचं आहे. चपाती तुम्ही पाहाल तर अगदी तव्यावर शेकवतात तशी चपाती कुकरवर शेकली आहे.

advertisement

Kitchen Jugaad Video : तेल-तुपाऐवजी चपातीवर टॉयलेट क्लिनर लावा; विचित्र आहे पण फायदाही मोठा

युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad - भात-डाळ-भाजीच नव्हे तर कुकरने तुम्ही चपातीही बनवू शकता; कसं ते पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल