गृहिणींकडे बरेच किचन जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा अजब किचन जुगाड, ज्यात तिने आईस्क्रिमच्या काठीचा टॉयलेटमध्ये वापर करून दाखवला आहे. हा जुगाड कदाचित तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीही करून पाहाल. आता तिने नेमकं काय केलं आहे ते पाहुयात.
व्हिडीओत पाहू शकता महिलेने एक आईस्क्रिमची काठी घेतली आहे. त्याच्या एका टोकावर तिने डबल साइड टेप लावली आहे. आता ही स्टिक ती टॉयलेटमध्ये घेऊन जाते. टॉयलेट सीट कव्हरच्या खाली तुम्हाला ही काठी घट्ट लावायची आहे. हे तुमचं घरगुती होल्डर तयार झालं. म्हणजे तुम्ही टॉयलेट कव्हर वरखाली करण्यासाठी याचा उपयोग करू शकता.
advertisement
Kitchen Jugaad Video : किचनमधील हळदीची टॉयलेटमध्ये कमाल; परिणाम पाहून नेहमी कराल हा उपाय
एरवी हातांनी टॉयलेट सीट कव्हर वरखाली करताना घाण वाटते. पण यामुळे आता तुम्हाला ते अधिक सोपं झालं आहे, शिवाय तुमचे हातही घाण होणार नाही.
युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
