रात्री बेसिनमध्ये लिंबू टाकण्याचा मोठा फायदा आहे. किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एकदा हा तुम्ही बेसिनमध्ये लिंबू टाकण्याचा परिणाम पाहाल तर तुम्हीसुद्धा हा उपाय नेहमी कराल. असा नेमका परिणाम काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
भेंडीची भाजी कधी बर्फ टाकून बनवलीये का? पाहा हा Kitchen Jugaad Video
advertisement
नेमकं करायचं काय?
कोणताही शॅम्पू सिंकमध्ये टाका. रसाळ लिंबू अर्ध कापून घ्या. शॅम्पू टाकला आहे, त्यावर लिंबू चोळत चोळत संपूर्ण सिंकमध्ये पसरवायचा आहे. शॅम्पू-लिंबाची लेअर सिंकमध्ये लावून घ्या.
फायदा काय?
किचन सिंकवर डाग पडले असतील, ते चिकट झालं असेल तर हा उपाय परिणामकारक आहे. सिंकमध्ये जास्त डाग असतील तर सिंकला शॅम्पू-लिंबू लावून दहा मिनिटं ठेवा आणि नंतर जाड स्क्रबरनं घासून घ्या. सिंकफक्त चिकट झालं असेल तर दोन-तीन मिनिटांनी घासून घ्या. घासल्यानंतर सिंक पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
अशा पद्धतीनं सिंक दररोज किंवा आठवड्याने स्वच्छ केलं, तर चिकटपणा, काळपटणा निघून जाईल, असा दावा महिलेनं केला आहे. कारण शॅम्पूमध्ये माइल्ड कॉस्टिक सोडा असतो. तो डाग काढण्यात मदत करतो.
Kitchen Jugaad : चपातीला नारळाची शेंडी लावताच झाली कमाल; काय ते Video मध्येच पाहा
Prajakta Salve युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)