TRENDING:

Kitchen Jugaad Video : फ्रिजला टॉयलेट क्लिनर नक्की लावा; उन्हाळ्यात वीज वाचवण्याचा जबरदस्त जुगाड

Last Updated:

फ्रिजला हार्पिक लावून लाइट बिल कसं कमी करायचं? हा जबरदस्त जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : टॉयलेट क्लिनर. ज्याने आपण टॉयलेट स्वच्छ करतो. पण तुम्ही कधी टॉयलेट क्लिनर फ्रिजला लावून पाहिलं आहे का? टॉयलेटप्रमाणे क्लिनरनं फ्रिजमध्येही कमाल करून दाखवली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण टॉयलेट चकाचक करणारं टॉयलेट क्लिनर फ्रिजला लावल्याने तुमचं लाइट बिल कमी होईल. एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

फ्रिज म्हटलं की लाइट बिल आलंच. वारंवार फ्रीज उघडल्याने फ्रीजच्या आतील तापमानावर फरक पडतो आणि फ्रीजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी वीजही जास्त लागते. परिणामी लाईट बिल जास्त येतं. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढण्याचं टेन्शनच नाही. कारण टॉयलेट क्लिनर वापरल्याने फ्रिजमुळे जास्त येणारं तुमचं लाइट बिल कमी होईल.

Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये फक्त पेपर अडकवा वाचेल वीज; उन्हाळ्यात लाइट बिल कमी करण्याचा भन्नाट जुगाड

advertisement

फ्रिजमुळे लाईट बिल का वाढतं?

तुम्ही पाहिलं असेल अनेकदा फ्रीजचा दरवाजा उघडायला गेल्यावर तो पटकन उघडतो किंवा किंचितसा उघडा राहतो. दरवाजा नीट लागत नाही. ज्यामुळे त्यातील थंड हवा बाहेर पडते. अशा परिस्थितीत फ्रीजला गॅस बनवण्यातही जास्त वीज लागते, त्याच्या कम्प्रेसरवर परिणाम होतो. आता फ्रीजचा दरवाजा नीट न लागण्याचं कारण म्हणजे दरवाजावर असलेला रबर. ज्याला गॅसकीट म्हणतता. तुम्ही नीट पाहाल तर नव्या फ्रीजमधील रबर थोडा फुगीर असतो. पण तो जुना झाला की हा रबर चिकटतो. त्याच्यात घाणही साचते. ज्यामुळे दरवाजा नीट लागत नाही.

advertisement

टॉयलेट क्लिनर कसं वाचवेल फ्रिजमुळे वाढणारं लाइट बिल?

फ्रिजमुळे वाढणारं लाइट बिल कमी करण्यासाठी हा रबर स्वच्छ करण्याची गरज आहे. पण तो असा सहजासहजी स्वच्छ होत नाही. त्यामुळे तुम्ही हार्पिकचा वापर करा.  एका भांड्यात हार्पिक घेऊन एका जुन्या टुथब्रशच्या मदतीने ते फ्रिजच्या रबरमध्ये घासा. संपूर्ण रबर असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यामुळे रबरमध्ये असलेली सर्व घाण स्वच्छ होईल. काही मिनिटांतच रबर नव्यासारखा चकचकीत होईल आणि तुम्ही दरवाजा बंद करून पाहिला तर तो आधीपेक्षा घट्ट लागेल. त्यातील थंड हवा बाहेर येणार नाही आणि फ्रिजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी जास्त वीज लागणार नाही. साहजिकच यामुळे तुमचं लाइट बिलही कमी होईल.

advertisement

Kitchen Jugaad Video : फ्रिजमधील दुर्गंधी दूर करेल एक वाटी; हा उपाय नक्की करून पाहा

सिम्पली मराठी युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फ्रिजला टॉयलेट क्लिनर नक्की लावा; उन्हाळ्यात वीज वाचवण्याचा जबरदस्त जुगाड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल