वॉशिंग मशीन, बादलीत तुम्ही कपडे धुतले असतील. पण कधी तुम्ही एका डब्यात कपडे धुवून पाहिले आहेत का? आता डब्यात कपडे कसे धुवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेने एक प्लॅस्टिक डबा घेतला आहे. त्याला छिद्रं पाडली आहेत. आता तिने या डब्याला दोरी बांधून तो एका ठिकाणी लटकवला आहे. त्यानंतर तिने बादलीतील ओले कपडे घेतले आणि ते या डब्यात टाकले. त्यानंतर तिने डब्याला बांधलेल्या दोरीला पिळ पडेल असा डबा गोलगोल फिरवला. त्यानंतर तिने तो सोडला.
advertisement
Alert! ताज्या पाण्याच्या वापरामुळे मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर जसा तिने डबा सोडला तसा दोरीला लागलेला पिळ आपोआप सुटू लागला आणि डबा गरागरा फिरू लागला. जसा डबा गोल फिरू लागला तसं त्यातील छिद्रातून पाणी येऊ लागलं. हे पाणी डब्यातील कपड्यांचं पाणी आहे. ज्याप्रमाणे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले जातात, तसेच कपडे या डब्यात धुतले जात आहेत. शेवटी तुम्ही पाहाल हळूहळू डब्यातून पाणी येणं बंद होईल, याचा अर्थ कपड्यांमध्ये पाणी राहिलं नाही. महिला ते कपडे काढून पिळून दाखवते, त्यात बिलकुल पाणी नाही आहे.
अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे कपडे वॉशिंग मशीनशिवाय वॉशिंग मशीनसारखेच धुवू शकता. कपड्यातील सर्व पाणी निघाल्याने ते लवकर सुकतील. सोबत तुमच्या विजेचीही बचत होईल, असं या महिलेने सांगितलं आहे.
हॉटेलमध्ये ठेवलेले शॅम्पू-कंडिशनर वापरता का? यामागचं धक्कादायक सत्य उघड
Creator Search 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
