दगडांचा उपयोग इस्री करण्यासाठी करता येऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? पण एका गृहिणीने ते करून दाखवलं आहे. अनेक गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा दगडांनी कपडे इस्त्री करण्याचा जबरदस्त असा किचन जुगाड. एकदा का तुम्ही पाहिला तर हाच उपाय कायम कराल.
advertisement
Kitchen Jugaad Video - दरवाजावर लावा पाण्याची पिशवी; ती समस्या घरात येणं दूर, दारातूनच पळून जाईल
महिलेने व्हिडीओत जे दगड दाखवले आहेत, तसे दगड तुम्हाला घ्यायचे आहेत. महिलेने सांगितल्यानुसार हे दगड एकदा गरम केले की ते बराच वेळ गरम राहतात. आता तुम्हाला एका भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे. हे पाणी प्रेशर कुकरमध्ये टाका आणि त्यात हे दगड टाका. आता कुकरचं झाकण लावून घ्या. जे कपडे प्रेस करायचे आहेत, त्यावर इस्त्रीसारखा हा कुकर फिरवा.
व्हिडीओत महिलेने हे करून दाखवलं आहे आणि त्याचा परिणामही आश्चर्यचकीत करणारा आहे. कपड्यांवरील सुरकुत्या काही वेळातच गायब झाल्याचं तुम्ही पाहाल.
Kitchen Jugaad : आईस्क्रिमच्या छोट्याशा काठीचा टॉयलेटमध्ये मोठा फायदा; फेकण्यापूर्वी हा Video पाहा
Avika Rawat Foods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि खरंच या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याचा परिणाम दिसून आला का, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
