काय आहे सविस्तर प्रकरण
मध्यप्रदेशच्या सिरोलमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 25 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. तक्रारीत, महिलेने आरोप केला होता की 2 मे 2023 रोजी हिंदू परंपरेनुसार तिचं लग्न झालं होतं. लग्नात तिच्या आई-वडिलांनी 5 लाख रुपये रोख, घरातील वस्तू आणि बुलेट मोटर सायकल हुंडा म्हणून दिला होता, पण लग्नानंतर पती दारू पिऊन तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक कृत्य करत होता. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा तो तिला मारहाण करत असे आणि हुंड्यासाठी त्रास देत असे. महिलेने अनेकवेळा महिला समुपदेशन केंद्र आणि पोलिसांकडे तक्रार केली, पण परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.
advertisement
पतीने दाखल केली याचिका
पतीने या प्रकरणात ग्वाल्हेर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि कलम 377 आणि हुंडा छळवणुकीशी संबंधित खटला रद्द करण्याची मागणी केली होती. त्याने असा युक्तिवाद केला की, तो आणि तक्रारदार विधिवत विवाहीत असल्यामुळे, कलम 377 अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा आरोप गुन्हा ठरत नाही. तसेच, त्याने हुंड्याची मागणी नाकारली.
न्यायालयाने काय म्हटलं?
सुनावणी दरम्यान अनेक जुन्या प्रकरणांचा हवाला देत न्यायालयाने म्हटलं की, सज्ञान पत्नीसोबत केलेले अनैसर्गिक संबंध बलात्कार किंवा 377 अंतर्गत गुन्हा मानले जाणार नाहीत, पण जर हे सर्व तिच्या इच्छेविरुद्ध घडले आणि मारहाण किंवा दबाव असेल, तर ते क्रूरतेच्या श्रेणीत येईल. न्यायालयाने म्हटलं की, क्रूरता केवळ हुंडा मागणीपुरती मर्यादित नाही, तर कोणतंही असं वर्तन ज्यामुळे पत्नीला मानसिक किंवा शारीरिक त्रास होतो, ते क्रूरता मानलं जाईल.
हे ही वाचा : बायकोच्या पोटात प्रियकराचं बाळ! लग्नाच्या 3 महिन्यांतच नवरदेवाचा घेतला टोकाचा निर्णय, आता...
हे ही वाचा : पती, 3 मुलं असूनही 35 वर्षांची शिक्षिका 23 वर्षांच्या पोरांसोबत गेली पळून; म्हणे, "12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये..."