पती, 3 मुलं असूनही 35 वर्षांची शिक्षिका 23 वर्षांच्या पोरांसोबत गेली पळून; म्हणे, "12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये..."
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
35 वर्षीय विवाहित महिला संजू देवी, जी तीन मुलांची आई आहे, तिचे 23 वर्षीय शेजारी कन्हैया कुमारसोबत प्रेमसंबंध जुळले. 12 वर्षांपासून...
एका 35 वर्षांच्या विवाहित महिलेचं तिच्याच शेजारी राहणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणावर प्रेम जडलं. प्रेमात इतकी आकंठ बुडालेली की, एके दिवशी या महिलेनं आपलं घरदार सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं. पण प्रियकराला भेटायला गेली असताना तिथे असं काही घडलं की, या प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील मलैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवारी टोला येथे हा 'हाय-व्होल्टेज ड्रामा' घडला.
तीन मुलांची आई, तरीही 12 वर्षांनी लहान तरुणासोबत राहण्याचा हट्ट!
ही महिला आधीच विवाहित आहे आणि तिला तीन मुलं आहेत. असं असूनही, ती तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत राहण्याचा हट्ट धरून त्याच्या घरी पोहोचली. जेव्हा तरुणाच्या कुटुंबीयांनी याला विरोध केला, तेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.
प्रियकराच्या घरी पोहोचली 'संबंधित' महिला
मलैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवारी टोला येथील संजू देवी (वय-35) नावाच्या महिलेने तिचा पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्यासाठी थेट त्याच्या घरी धाव घेतली. संजू देवी एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे आणि तिला तीन मुलं आहेत. मोठी मुलगी 12 वर्षांची आहे, दुसरी 11 वर्षांची आणि मुलगा 10 वर्षांचा आहे. पण संजू देवीला तिच्या शेजारी राहणाऱ्या 23 वर्षांच्या कन्हैया कुमारवर प्रेम जडलं.
advertisement
दोघांनीही एकत्र राहायचं ठरवलं आणि संजू देवी घरातून पळून शेजारीच असलेल्या कन्हैयाच्या घरी पोहोचली. यावेळी कन्हैयाच्या पालकांनी महिलेला त्यांच्या घरात पाहिलं, तेव्हा त्यांना प्रकरण समजायला वेळ लागला नाही. यानंतर तिथे जोरदार वाद सुरू झाला.
'12 वर्षांपासून प्रेमसंबंधात आहोत!' - महिलेचा दावा
संबंधित महिला संजू देवीने दावा केला की, ती गेल्या 12 वर्षांपासून कन्हैयासोबत प्रेमसंबंधात आहे आणि आता दोघांनाही एकत्र राहायचं आहे, म्हणूनच ती त्याच्या घरी आली. तरुणाच्या कुटुंबीयांनी याला विरोध केला, त्यानंतर तिथे गावकऱ्यांची गर्दी जमली. कन्हैयाच्या आईने संजूला घरात ठेवण्यास नकार दिला, पण संजू आणि कन्हैया दोघेही एकत्र राहण्यावर ठाम होते. अखेर स्थानिक लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांना कळवण्यात आलं.
advertisement
दोघेही आपल्या मतावर ठाम!
यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात नेलं. खूप समजावून सांगितल्यानंतरही दोघेही एकत्र राहण्यावर ठाम राहिले. एसएचओ विकास कुमार यांनी सांगितलं की, महिला आणि तरुण दोघेही सज्ञान आहेत आणि त्यांच्या परस्पर संमतीने त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासोबत घरी पाठवण्यात आलं आहे.
हे ही वाचा : थेट विज्ञानाला आव्हान! 'या' तळ्यात आजही ऐकू येत नाही बेडकांचा आवाज, त्यामागचं नेमकं रहस्य काय?
advertisement
हे ही वाचा : ना चालवणार, ना विकणार... 30 वर्षांपासून एकाच जागी उभा आहे 'हा' ट्रॅक्टर; या कुटुंबांची आहे अनोखी जिद्द!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पती, 3 मुलं असूनही 35 वर्षांची शिक्षिका 23 वर्षांच्या पोरांसोबत गेली पळून; म्हणे, "12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये..."


