चक्रव्यूह असं स्वरूप होतं ज्यामध्ये प्रवेश करणं सोपं होतं पण त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. ही रचना तोडण्याची कला फक्त काही योद्ध्यांकडेच होती. ज्यात श्रीकृष्ण, अर्जुन, द्रोणाचार्य आणि प्रद्युम्न यांचा समावेश होता. पण आणखी एक योद्धा होता ज्याला या रहस्यमय रचनेबद्दल माहिती होती, तो अभिमन्यू होता. अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा अभिमन्यू याने आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूहात प्रवेश करण्याची कला शिकली. तथापि, जेव्हा अर्जुन चक्रव्यूहातून बाहेर पडण्याबद्दल बोलत होता, तेव्हा सुभद्रा झोपी गेली आणि अभिमन्यू ते ज्ञान प्राप्त करू शकला नाही.
advertisement
Mahabharat : महाभारत युद्धात मारले गेलेले योद्धे, 15 वर्षांनी पुन्हा जिवंत झाले, पण कसे?
युद्धाच्या तेराव्या दिवशी, जेव्हा पांडवांना चक्रव्यूहात अडकवण्याचं आव्हान आलं, तेव्हा अभिमन्यूने कोणताही संकोच न करता रचनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शौर्याने आणि कौशल्याने त्याने चक्रव्यूहाचे सहा दरवाजे ओलांडले पण सातव्या दरवाज्यावर तो अडकला.
अभिमन्यू चक्रव्यूहातून का बाहेर पडू शकला नाही?
कौरवांनी युद्धाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अभिमन्यूला सर्व बाजूंनी घेरलं. द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन आणि इतर कौरव योद्ध्यांनी मिळून अभिमन्यूवर हल्ला केला. अभिमन्यूने 16 वर्षे एकट्याने त्यांच्याशी लढा दिला पण शेवटी त्याला शहीद व्हावं लागलं.
अभिमन्यूचा मृत्यू ही एक दुःखद घटना होती पण त्याचं शौर्य आणि धाडस आजही लक्षात ठेवलं जातं. वय महत्त्वाचं नसतं. मनात धाडस आणि दृढनिश्चय असेल तर कोणत्याही अडचणीला तोंड देता येतं हे त्याने सिद्ध केलं.
अभिमन्यूची कहाणी आपल्याला काय शिकवते?
कधीही हार मानू नका : अभिमन्यूने प्रतिकूल परिस्थितीतही हार मानली नाही आणि धैर्याने लढला.
ज्ञानाचं महत्त्व : अभिमन्यूने त्याच्या आईच्या गर्भातच ज्ञान मिळवलं. जे दर्शवते की ज्ञान कोणत्याही स्वरूपात आणि कधीही मिळवता येते.
धैर्य आणि आत्मविश्वास : अभिमन्यूने आत्मविश्वासाचं प्रतीक असलेल्या चक्रव्यूहात प्रवेश करून धैर्य दाखवलं.