कुंतीभोज राजाची कन्या आणि कर्णाची आई कुंती लहानपणापासूनच ऋषीमुनींची सेवा करायची. एकदा दुर्वासा ऋषींनी तिला प्रसन्न होऊन एक मंत्र दिला. हा मंत्र म्हणून ज्या कोणत्या देवाचं आवाहन करशील तो देव प्रकट होईल आणि त्याच देवापासन तुला पुत्रप्राप्ती होईल, असं वरदान कुंतीला मिळालं. कुंतीलाही आश्चर्य वाटलं. तिनं एकदा एकांतात हा मंत्र म्हटलं आणि सूर्यदेवाचं आवाहन केलं. सूर्यदेव प्रकट झाले आणि त्यांच्यापासून कुंतीला पुत्रप्राप्ती झाली.
advertisement
Mahabharat : म्हणतात, अजूनही आहेत कर्णाचे कवच कुंडल, पण ते कुठे ठेवलेत?
असं म्हटलं जातं की, कर्णाचे कान खुप सुंदर होते. ज्यात दिव्य कुंडलं होती. त्यामुळेच त्याचं कर्ण हे नाव सर्वात प्रसिद्ध झालं. कर्ण या नावाचा अर्थ सुंदर कान असलेला असा होतो. तो सूर्य आणि कुंतीचा पुत्र म्हणून सूर्यपुत्र, कुंतीपुत्र म्हणूनही ओळखला जातो.
कर्ण दान करायचा. त्याच्याकडे कुणी काही मागितलं तर तो रिकाम्या हाताने परत जायचा नाही. अगदी मरेपर्यंत कर्णाने दान केलं होतं. अगदी फक्त त्याच्याकडेच असलेली कवचकुंडलंही त्याने दान केली. दानाच्या या स्वभावामुळे त्याला दानवीर कर्ण असंही म्हणतात. जेव्हा कर्णाने देवराज इंद्रला स्वत:ची कवच-कुंडलं दान केली तेव्हा त्याला वैकर्तन असं नाव पडलं. वैकर्तन नावाचा अर्थ सूर्याच्या वंशात जन्म झालेली व्यक्ती असा होतो. अंगदेशचा राजा म्हणून त्याला अंगराज असंही म्हणतात.
Mahabharat : कर्णाची पत्नी कोण होती, तिचं नाव काय?
कर्णाच्या जन्मानंतर त्याची आई कुंतीनं त्याला गंगा नदीत सोडून दिलं. त्यानंतर तो हस्तिनापुरातील सारथी म्हणजे सुताला अधिरथला मिळाला. म्हणून त्याला सुतपुत्र म्हणतात. याशिवाय कर्णाला राधेय असंही म्हटलं जातं. कर्णाला हे नाव यासाठी मिळालं होतं कारण राधा नावाच्या महिलेने त्याला लहानाचं मोठं केलं होतं.
पण महाभारतानुसार कर्णाचं खरं नाव वासुसेन असं आहे. कर्णाचं पालन-पोषण करणाऱ्या म्हणजेच अधिरथ आणि राधा यांनी त्याला हे नाव दिलं होतं. वासुसेन या नावाचा अर्थ धनासह जन्माला आलेला असा होतो.
