...असं पकडलं सापाला
मिळालेल्या माहितीनुसार, लियाकत खान (वय-49) हे माजरी चौकाजवळ खडक मंगोली येथील गेट-3 मध्ये राहतात. त्यांनी सांगितलं की, सेक्टर-19 मध्ये साप निघाल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्या सापाला पकडलं. त्यानंतर ते त्या सापाला मोरनी टी-पॉइंटजवळ सोडायला गेले होते. त्याच दरम्यान, जसा ते सापाला सोडत होते, तसा साप त्यांच्या हातावर उडी मारून चावला.
advertisement
साप गाडी आला अन् मेला
वेदना जाणवल्यावर त्यांनी सापाला सोडलं आणि तो रस्त्याच्या दिशेने गेला. पण त्याच वेळी तो साप एका गाडीखाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर लियाकत खान त्या मृत सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी त्यांना अँटी-व्हेनम इंजेक्शन (Anti-venom injection) दिलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इमर्जन्सीमध्ये तैनात असलेले डॉ. अमरजित सिंह यांनी सांगितलं की, पीडित व्यक्तीची प्रकृती ठीक आहे.
सापामुळे उपचार करणं झालं सोपं
या व्यक्तीने डॉक्टरांना तो साप दाखवला आणि याच सापाने आपल्याला चावल्याचं सांगितलं, ज्यामुळे कोणत्या प्रकारचं विष शरीरात गेलं आहे हे ओळखणं डॉक्टरांना सोपं गेलं. डॉक्टरांनी तत्परता दाखवत लगेच उपचार सुरू केले आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. हॉस्पिटलमध्ये सापाला डॉक्टरांना दाखवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात साप चावल्यानंतर एक व्यक्ती चक्क सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला आहे.
हे ही वाचा : घरात 'हे' 4 जीव दिसताच, तुमचं नशीब उजळणार, दूर होणार अडचणी; शास्त्रात सांगून ठेवलंय रहस्य!
हे ही वाचा : सावधान! जुळ्या भावांसारखे दिसतात 'हे' 2 साप; एक बिनविषारी तर दुसरा विषारी; एक चूक अन् खेळ खल्लास!