सोशल मीडियावर डॉमिनो़ज पिझ्जा संदर्भात एका व्यक्तीने फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आवडीने मागवलेल्या पिझ्जाचा बॉक्स उडल्यावर त्याला काय दिसले ते सांगितले आहे. ज्यामुळे हा विषय सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड झाला आहे.
अनेक कंपन्या पिझ्झा विकतात, पण डॉमिनोज पिझ्झा खूप चांगला मानला जातो. यामुळे, मोठ्या शहरांच्या जवळपास प्रत्येक चौकात तुम्हाला डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्स आढळतील, जिथे खूप गर्दी देखील दिसते. लोक त्यांच्या घरी देखील डॉमिनोज वरून पिझ्झा ऑर्डर करतात परंतू कदाचित ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही तो पुन्हा ऑर्डर करणार नाही.
advertisement
अलीकडे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit च्या ग्रुप @Nutty_ls17 नावाच्या वापरकर्त्याने पिझ्जाशी संबंधित एक आश्चर्यकारक अनुभव सांगितला. त्याने एक फोटो पोस्ट केला जो सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्या व्यक्तीने लिहिले- “बऱ्याच दिवसांपासून डॉमिनोजचे काहीही खाल्ले नव्हते. त्यांचा पूर्वी चांगला व्यवहार असायचा. पण आता नाही.
कॅप्शनमध्ये लिहिले "तो फोटोमध्ये सॉस नाही, तो ग्रीस आहे." हे वाहनांमध्ये टाकलेले ग्रीस नसून प्राण्यांची गोठलेली चरबी आहे.
Haven't had a domino's for ages, they had some good deals for once. Never again that's grease not sauce!byu/Nutty_ls17 inUK_Food
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीने पिझ्झा वर उचलला आहे आणि त्याच्या खाली खूप ग्रीस दिसत आहे, ज्यामुळे तो केवळ आश्चर्यचकित झाला नाही तर इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांना देखील आश्चर्यचकित केलं आह. ही पोस्ट व्हायरल होत असून, त्यावर शेकडो लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लोक डॉमिनोजवर टीका करत आहेत एका व्यक्तीने सांगितले की, त्याला 7 वर्षांपूर्वीपासून डॉमिनोजची समस्या आहे की, तुम्ही जो काही पिझ्झा खरेदी करता, त्यात टॉपिंग्स सारखेच असायचे, यामुळे त्याने डॉमिनोज पिझ्झा खाणे बंद केलं आहे.