मलेशियातील जोहोर इथली ही धकादायक घटना. 33 वर्षीय व्यक्ती जी मूळची बांगलादेशातील, बांगलादेशातून तो मलेशियात कामासाठी आला होता. त्याचं लग्न झालं आहे. त्याची पत्नी बांगलादेशात राहते. तर मलेशियात त्याचे 34 वर्षांच्या बांगलादेशी महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले.
गेलांग पटह येथील कंपुंग लोकेन इथं 8 ऑक्टोबर 2025 रोजी दोघं भेटले. त्यांच्यात रोमान्स झाला. पण काही वेळाने दोघांमध्ये वाद झाला. रागात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडवर 29 सेंटीमीटर लांबीच्या चाकूने हल्ला केला. तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट कपाल, त्याच्या डाव्या हातालाही गंभीर दुखापत केली. व्यक्तीला ताबडतोब जोहोर बहरू येथील सुल्तान अमिनाह रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तो सध्या उपचार घेत आहे.
advertisement
ऑनलाईन रेटिंग पाहून बुक केलं हॉटेल, रूममध्ये जाताच फुटला घाम, असं पाहिलं काय? Watch Video
एका 47 वर्षीय स्थानिक पुरुषाने जो या व्यक्तीचा ओळखीचा होता, त्याने सकाळी 10.45 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती दिली. इस्कंदर पुतेरी पोलिसांनी दुपारी 12.15 वाजता महिलेला अटक केली. इस्कंदर पुतेरी पोलीस प्रमुख एसीपी एम कुमारसन म्हणाले, "तपासातून असं दिसून आलं की ही घटना मत्सरामुळे प्रेरित होती. महिलेला कळलं की तिच्या प्रियकराचे बांगलादेशात राहणाऱ्या त्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध आहेत, त्याने तिला घटस्फोट दिला नव्हता. "
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला. महिलेचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. तिच्या ड्रग्ज टेस्टचा रिपोर्टह निगेटिव्ह आला आहे. तिला 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान चौकशीसाठी पाच दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
सकाळी 7 वाजता किंचाळण्याचा आवाज, मालक धावत आला, तुरुंगात जाता जाता वाचला, असं घडलं काय?
महिलेकडे वैध प्रवास कागदपत्रे नव्हती. म्हणूनच इमिग्रेशन कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू झाला आहे. शस्त्राने गंभीर दुखापत करण्याशी संबंधित दंड संहितेच्या कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षेसाठी 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड आहे. याव्यतिरिक्त, इमिग्रेशन कायदा 1959/63 च्या कलम 6(1)(क) मध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि वास्तव्याचा आरोप आहे, ज्यासाठी 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाने अमेरिकेतील लोरेना बॉबिट प्रकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. 1993 मध्ये लोरेना गॅलोने तिचा पती जॉन बॉबिटचं गुप्तांग कापलं. ही महिला घरगुती हिंसाचाराची बळी होती. नंतर सर्जन्सनी तो अवयव पुन्हा जोडला.