सध्या एआयचा जमाना आहे. एआयचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो आहे. बहुतेक लोक सध्या फक्त फोटो एडिटिंग आणि माहितासाठी एआयचा वापर करतात. पण तुम्ही विचार तरी केला होता का? की हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासाठीही एआयचा वापर करता येऊ शकतो. एका व्यक्तीने ते केलं.
advertisement
अमेरिकेतील ही व्यक्ती ज्याच्या मेहुण्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. मृत्यूच्या 4 तास आधीच त्याला रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. त्यासाठी रुग्णालयाने 1,95,000 डॉलर्स म्हणजे तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयांचं बिल दिलं. तेव्हा त्याने एआय चॅटबोटच्या मदतीने ते तपासलं.
nthmonkey नावाच्या एका युझरने थ्रेडवर लिहिलं की रुग्णालयाच्या बिलात अनेक गोंधळात टाकणारे आणि अस्पष्ट शुल्क होतं. त्यानंतर त्याने अँथ्रोपिकच्या क्लाउड एआय चॅटबॉटची मदत घेतली. बिलाचं विश्लेषण केल्यानंतर चॅटबॉटला आढळलं की रुग्णालयाने ऑपरेशनसाठी संपूर्ण रक्कम मागितली होती आणि नंतर ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी वेगळे पैसे आकारले होते. यामुळे बिलात अंदाजे 90 लाख रुपये अतिरिक्त रक्कम जोडली गेली. शिवाय रुग्णालयाने अनेक चुकीचे खर्च देखील जोडले होते.
General Knowledge : Wi-Fi पासवर्ड टाकताच इंटरनेट कसं काय सुरू होतं बरं?
एआयने चॅटबॉटने या व्यक्तीला फक्त हॉस्पिटलच्या बिलमधील त्रुटी काढण्यातच मदत केली नाही, तर कायदेशीर कारवाईसाठी लेटरही बनवून दिलं. जेव्हा त्या माणसाला बिलात त्रुटी आढळल्या तेव्हा त्याने एआय चॅटबॉटचा वापर करून एक लेटर बनवलं आणि ते रुग्णालयाला पाठवलं, ज्यामध्ये चुकांची माहिती दिली गेली आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णालयाने बिल कमी केलं, फक्त 33,000 डॉलर्स म्हणजे 29 लाख रुपयांचं एक नवीन बिल जारी केलं.
एआयच्या मदतीने व्यक्तीने हॉस्पिटलचं कोट्यवधी रुपयांचं बिल कमी केलं. 1.6 कोटींऐवजी शेवटी त्याला फक्त 29 लाख रुपयेच द्यावे लागले. एक कोटीहून अधिक पैसे त्याने वाचवले.
