Honeymoon : हनीमूनला हॉटेलमध्ये दरवाजाला फक्त लॉक लावून फायदा नाही, टॉवेलही न विसरता अडकवा; कर्मचाऱ्यांनीच सांगितलं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Honeymoon Hotel : आता लग्नसराई सुरू आहे. लग्नानंतर कित्येक कपल हनीमूनला जातील आणि हनीमून म्हटलं की हॉटेलमध्ये राहणं आलं. हॉटेलमध्ये राहताना दरवाजा आपण लॉक लावतो. पण तितकंच पुरेसं नाही. दरवाजाला टॉवेलही अडकवायला हवा.
advertisement
याचं कारण काय ते एका एअर हॉस्टेस आणि हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितलं आहे. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, सिस्सी नावाच्या एअर होस्टेसने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला. तिनं सांगितलं की, रात्री झोपताना तुमच्या हॉटेलचा दरवाजा आणि दरवाजाच्या चौकटीमध्ये टॉवेल ठेवावा आणि दरवाजा लॉक करा.
advertisement
advertisement
तर याआधी टेरेन्स नावाच्या या टिकटॉकरने सांगितलं आहे, की जर तुम्हाला रात्री शांतपणे झोपायचं असेल आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नको असेल तर एक हँड टॉवेल घ्या आणि तो दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या कडीवर अडकवावा लागेल. ते फिरवून दुसऱ्या बाजूने खाली आणावं आणि ते रबर बँडच्या मदतीने चांगले सुरक्षित करावे.
advertisement


