हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात फूड स्टॉल लावण्यात आला होता. इथं 31 वर्षीय रेशमा फिरण्यासाठी आली होती. तिला भूक लागली होती, काहीतरी हलकंफुलकं खावं म्हणून तिने मोमोज खाल्ले. हे मोमोज खाल्ल्यानंतर तिला अचानक त्रास होऊ लगला. त्यानंतर ती धाडकन जमिनीवर आदळली आणि यातच तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे मोमोज खाल्ल्याने अन्य 50 जणांची प्रकृती बिघडली. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त! तुम्ही खाता त्या मिठाईत तर नाही ना? कसं ओळखायचं?
मृत महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या परिसरात मोमोज विकणाऱ्या दुकानदाराला ताब्यात घेतलं आहे आणि पुढील तपास करत आहेत. तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने मेयोनीजवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.
सँडविच, मोमोजमध्ये मेयोनीजचा वापर केला जातो. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, राज्यात अशी बरीच प्रकरणं आली आहेत ज्यात कच्च्या अंड्यापासून बनलेलं मेयोनीज खाऊन समस्या उद्भवल्या आहेत. गेल्या काही महिन्यात बरीच प्रकरणं आणि तक्रारी समोर आल्या आहेत. कच्च्या अंड्यापासून बनलेलं मेयोनीज खाल्ल्याने अन्न विषबाधा झाली आहे. त्यामुळे याचं उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर 30 ऑक्टोबर 2024 पासून वर्षभर निर्बंध असेल.