कुठे रस्त्यांवर पाणी साचलं तर कुठे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली. कधीही न थांबणारी ट्रेन आज अचानक थांबल्यानं चाकरमन्यांचे मात्र हाल झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरलं तर काहींची घरं वाहून गेली. एवढंच कमी होतं की काय तर संध्याकाळी मोनोट्रेन बंद पडल्याचीही खबर आली. यासगळ्याचे व्हिडीओ दिवसभरापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
यापैकी काही हायलाइट व्हिडीओ पाहू
रस्ते तुंबले
सकाळपासूनच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन, दादर, कुर्ला, अंधेरीसारख्या भागांत रस्त्यांवर प्रचंड पाणी साचले. गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या. कुठे स्कूटरवाल्यांना पाण्यात गाडी ढकलावी लागली तर कुठे कार बंद पडल्याचे दृश्य दिसले.
लोकल ट्रेन सेवा विस्कळीत
मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन आज वारंवार थांबली. पाणी ट्रॅकवर शिरल्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावत होत्या, तर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना स्टेशनवर तासन्तास थांबावे लागले.
मोनोरेल बंद पडली
लोकलनंतर मोनोरेलनेही साथ सोडली. काही भागांमध्ये सेवा पूर्णपणे ठप्प झाली आणि प्रवासी वीज गेल्यानं ट्रेनमध्येच अडकले. एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना श्वास घेणं ही कठीण झालं. ज्यामुळे फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं.
मुंबईकरांनी अनुभवलेले हे क्षण सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले. कुणी पाण्यातून चालत ऑफिसकडे जाताना दिसलं, तर कुणी अडकलेल्या लोकलमधून लाईव्ह व्हिडीओ काढला. या सर्वांमुळे आजचा दिवस सोशल मीडियावर #MumbaiRains या हॅशटॅगखाली ट्रेंड झाला.
एकूणच आजचा दिवस मुंबईकरांसाठी तुफानी ठरला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोशल मीडियावर फिरणारे व्हिडीओ हीच खरी "मुंबईची स्टोरी" सांगत आहेत. पाऊस आला की सगळं थांबतं, पण मुंबईकर मात्र थांबत नाहीत.