TRENDING:

Jugaad Video : नेलकटरचा वापर करून असे शिवा कपडे, शिलाई मशीनची गरज पडणार नाही

Last Updated:

Jugaad Video : नेलकटरचा अनोखा असा वापर आजवर तुम्हाला कुणीच दाखवला नसेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : नेलकटरचा वापर कशासाठी करतो, असं विचारलं तर साहजिकच प्रत्येक जण म्हणेल नखं काढण्यासाठी. त्याच्या नावातच त्याचा वापर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, नेलकटरचा वापर करून तुम्ही कपडेही शिवू शकता. नेलकटरचा अनोखा असा वापर आजवर तुम्हाला कुणीच दाखवला नसेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नेलकटरचा अनोखा वापर
नेलकटरचा अनोखा वापर
advertisement

कपडे शिवण्यासाठी लागते ते शिलाई मशीन पण शिलाई मशीनचा वापर न करता तुम्ही नेलकटरनेही कपडे शिवू शकता. असं तुम्हाला कुणी सांगितलं तर साहजिक आश्चर्य वाटेल. किंबहुना विश्वास बसणार नाही. पण एका महिलेने ते करून दाखवलं आहे. आता नेलकटरने कपडे कसे काय शिवायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Kitchen Jugaad Video : गॅसवर खोबरेल तेल टाकताच झाली कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल

advertisement

बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की कपडे जाड असतात किंवा कपड्याचा एखादा भाग जाड असतो. तिथं सुई सहजासहजी घुसत नाही, ती तुटते. मशीनमध्येही असे कपडे टाकले तर मशीनही बिघडू शकते. असे कपडे तुम्ही साध्या नेलकटरने शिवू शकता. आता ते कसे ते पाहुयात.

नेलकटरने कपडे शिवण्याची पद्धत

नेलकटरमध्ये तुम्ही पाहिलं असेल नखं काढताना जो भाग आपण प्रेस करतो, तो उलटा केला की त्याच्या मागच्या बाजूला बारीक रेषा असतात. हा भाग खडबडीत असतो. नखं कापल्यानंतर या भागावर आपण ती घासतो आणि नखांना शेप देतो. याच भागावर तुम्हाला सुई घासायची आहे.

advertisement

Kitchen Jugaad Video - किचनपासून बाथरूमपर्यंत, कंगवा करेल तुमची सर्व कामं

नेलकटरवर सुई घासण्याआधी आणि नंतर दोन्हीमधील फरक तुम्ही पाहा. आधी कपड्यात न घुसणारी सुई नेलकटरवर घासल्यानंतर सहज घुसते. तुम्हाला मशीनची बिलकुल गरज पडत नाही.

इथं पाहा व्हिडीओ

पुणेरी तडका युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

advertisement

नेलकटरने सुईत धागाही टाकता येतो

शिवणकामात नेलकटरचा इतकाच उपयोग नाही. तर नेलकटरचा वापर करून तुम्हाला सुईत धागाही टाकता येतो. जे कित्येकांसाठी कठीण काम आहे.

यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर झाडूचा एक छोटा दोर घ्यायचा आहे. हा दोर नेलकटरच्या मागच्या भागात जिथं छिद्र असतं, त्या छिद्रात टाकायचा. या दोराचे टोकाचे दोन्ही भाग जुळवून घ्यायचे. दोर नीट राहावा म्हणून त्याला चिकटपट्टीने नेलकटरला चिकटवायची. या दोरात सुई टाका, जी त्यात सहज जाईल. आता या दोरात धागा टाका आणि दोरातील सुई खेचून धाग्यात घ्या.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : नेलकटरचा वापर करून असे शिवा कपडे, शिलाई मशीनची गरज पडणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल